सहलीचा आनंद क्षणात मावळला! कासारसाई धरणात बुडून विद्यार्थ्याचा मृत्यू
सहलीचा आनंद क्षणात मावळला! कासारसाई धरणात बुडून विद्यार्थ्याचा मृत्यू
img
Dipali Ghadwaje
राज्यभरात पावसाने धुमाकूळ घातला आहे. अशात पावसाळ्यात वर्षाविहाराचा आनंद लुटण्यासाठी अनेकजण विविध ठिकाणी भेट देतात. दरम्यान हुल्लडबाजी आणि सुरक्षिततेकडे दुर्लक्ष यामुळे पर्यटनस्थळी आणि पर्यटनाच्या मार्गावर अपघाताच्या घटना घडण्याचे प्रमाण वाढले आहे.

पावसामुळे पर्यटनस्थळी पर्यटक गर्दी करत असून अनेक मोठ्या दुर्घटनाही घडत आहेत. अशीच धक्कादायक घटना मावळमधून समोर आली आहे. मावळच्या कासरसाई धरणात बुडून विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. 

दरम्यान याबाबत मिळालेल्या माहितीनुसार , मावळच्या कासरसाई धरणात बुडून थेरगाव येथील एम एम कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. सारंग रामचंद्र डोळसे असे मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. कॉलेजला सुट्टी टाकून थेरगाव येथील एमएम शाळेचे पाच विद्यार्थी कासारसाई धरणावर पर्यटनासाठी आले होते. धरण बघत असताना पाण्यात उतरून खेळण्याचा मोह सारंगला आवरला नाही. पाण्यात उतरुन खेळत असताना पाण्याच्या खोलीचा त्याला अंदाज आला नाही आणि तो खोल पाण्यात वाहून गेला.

बाकीच्या मित्रांनी आरडा ओरडा केल्यानंतर गावातील नागरिकांनी परंडवाडी पोलिसांना फोन केला. परंडवाडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. आजूबाजूला तपासणी केल्यानंतर पोलिसांनी शिवदुर्ग रेस्क्यू टीमला प्रचार केले. शिवदुर्ग टीमने काही वेळातच मृतदेह बाहेर काढला.

पुढील तपासणीसाठी त्याला पवना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. अधिक तपास परंडवाडी पोलीस करीत आहेत.  
इतर बातम्या
Join Whatsapp Group