महाविकास आघाडीच्या चर्चेसाठी काँग्रेसची समिती नियुक्त
महाविकास आघाडीच्या चर्चेसाठी काँग्रेसची समिती नियुक्त
img
Dipali Ghadwaje

नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने महाविकास आघाडीतील इतर पक्षांशी चर्चा करण्यासाठी काँग्रेसने मुंबई आणि महाराष्ट्र अशा दोन स्वतंत्र समित्या नियुक्त समित्या नियुक्त केल्या आहेत.

राज्य स्तरावरील चर्चेसाठी नियुक्त करण्यात समितीत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, पृथ्वीराज चव्हाण, डॉ. नितीन राऊत, अरिफ नसीम खान व सतेज (बंटी) पाटील यांचा समावेश आहे, तसेच मुंबई प्रदेश स्तरावर खा. वर्षा गायकवाड, अशोक जगताप (भाई जगताप) व असलम शेख यांची नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती काँग्रेसच्या नवी दिल्ली मुख्यालयातून जनरल सेक्रेटरी खा. के. सी. वेणुगोपाल यांनी एका पत्रकान्वये दिली.


इतर बातम्या
Join Whatsapp Group