आपण सुंदर दिसावं असं कुणाला वाटत नाही. तरुणी तर सौंदर्याच्या बाबतीच खूपच विचार करतात. आता सुंदर दिसण्यासाठी महिला काय करतील आणि काय नाही याचा काही नेम नाही. आजकाल महिला हात सु्ंदर दिसावेत यासाठी मॅनिक्युअर सुद्धा करतात. तुम्ही देखील ४ ते ५ महिन्यांतून एकदा तरी मॅनिक्युअरसाठी पार्लरमध्ये जात असाल.
मॅनिक्युअर करताना नेलपॉलिश सुकण्यासाठी यूवी ड्रायरचा वापर केला जातो. तुम्ही सुद्धा याचा वापर करत असाल तर सावधान. कारण यूवी ड्रायर आपल्या आरोग्यासाठी घातक असल्याचं एका अभ्यासातून समोर आलं आहे.
यूनिवर्सिटी ऑफ कॅलीफोर्निया आणि यूनिवर्सिटी ऑफ पिट्सबर्गमार्फत केलेल्या अभ्यासात अशी माहिती समजली आहे की, मॅनिक्युअर करताना वापल्या जाणाऱ्या मशीन आपल्या आरोग्यासाठी घातक ठरल्या आहेत. याने आपल्याला त्वचेशी संबंधित काही समस्या उद्भवतात. पुढे या समस्या त्वचेच्या कॅन्सरपर्यंत पोहचू शकतात.
अनेक तरुणींना याबद्दल माहिती नाही की, जेल मॅनिक्युअर आपल्या आरोग्यासाठी घातक आहे. नखांना नेलपेंट केल्यावर ते सुकण्यासाठी आर्टिफीशल सूवी रेजचा वापर केला जातो. आपल्या त्वचेसाठी यातील रेज प्रचंड घातक आहेत. काही महिलांना यानंतर त्रास होत असल्याचं सुद्धा समोर आलं आहे. त्यामुळे मॅनिक्युअर करताना जेल मॅनिक्युअर करणे टाळलं पाहिजे.
हातात ग्लोज वापरा
यूनिवर्सिटीने केलेल्या अभ्यासानुसार, मॅनिक्युअर करताना आपल्याला त्वचेचा कॅन्सर होण्याची शक्यता आसते. संपूर्ण हातावर याचा प्रभाव होऊ नये म्हणून तुम्ही फिंगल लेस ग्लोज सुद्धा वापरू शकता. याचा वापर केल्याने तुमची त्वचा कोमल आणि सुरक्षित राहते. ज्या पद्धतीने आपण उन्हात किरणांपासून वाचण्यासाठी हातात ग्लोज परिधान करतो तसेच मॅनिक्युअर करताना त्वचेची काळजी घेण्यासाठी हातात ग्लोज घातले पाहिजेत.
नेलपॉलीश नैसर्गिक पद्धतीने सुकवा
नेलपॉलीश सुकवण्यासाठी तुम्ही अन्य कोणताही वापर न करता फक्त नैसर्गिक पद्धतीचा वापर केला पाहिजे. यासाठी तुम्ही नेलपॉलिश लावल्यानंतर हात पंख्यासमोर ठेवू शकता. तसेच तुम्ही स्वत: उन्हात बसून नेलपॉलीश सुकवू शकता.