सध्या सणासुदीचे दिवस सुरु झाले आहे. नवरात्रीनंतर लगेचच दिवाळी येणार आहे. दिवाळीनंतर लगीनसराईला सुरुवात होईल. त्यामुळे अनेकजण सोने-चांदीचे दागिने खरेदी करतील. सोने-चांदीच्या किंमती गेल्या अनेक दिवसांपासून गगनाला भिडल्या आहेत. त्यामुळे सोने-खरेदीदारांच्या खिशाला फटका बसत आहे.
सोने चांदीच्या किंमती गेल्या अनेक दिवसांपासून ७५ हजारांपेक्षा जास्त आहेत. आज तर सोन्याचे भाव ७७,४५० रुपये प्रति तोळा आहे. सोन्यासह चांदीच्याही किंमती वाढताना दिसत आहे. त्यामुळे सोने-चांदी खरेदी करावी की नाही असा प्रश्न खरेदीदारांच्या मनात निर्माण झाला आहे.
२४ कॅरेट सोन्याची किंमत
१० ग्रॅम सोन्याची किंमत ७७,४५० रुपये आहे. आज सोन्याच्या किंमतीत जवळपास ५४० रुपयांनी वाढ झाली आहे. ८ ग्रॅम सोन्याची किंमत ६१,९६० रुपये आहे. १०० ग्रॅम सोन्याची किंमत ७,७४,५०० रुपये आहे.
२२ कॅरेट सोन्याची किंमत
आज २२ कॅरेट सोन्याची किंमत ७१,००० रुपये प्रति तोळा आहे. सोन्याच्या किंमतीत ५०० रुपयांनी वाढ झाली आहे. ८ ग्रॅम सोन्याची किंमत ५६,८०० रुपये आहे.
१८ ग्रॅम सोन्याची किंमत
आज सोने ५८,०९० रुपये प्रति तोळा विकले जात आहे. ८ ग्रॅम सोन्याची किंमत ४६,४७२ रुपये आहे. या किंमतीत देखील ४१० रुपयांनी वाढ झाली आहे.
चांदीच्या किंमती आज ८ ग्रॅम चांदी ७६० रुपयांना विकली जात आहे. १० ग्रॅम चांदीची किंमत ९५० रुपये आहे. १०० ग्रॅम चांदीची किंमत ९,५०० रुपये आहे. चांदीच्या किंमतीत आज कोणताही बदल झालेला नाही.