
५ ऑक्टोबर २०२४
नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- नाशिक शहरात युवकांमध्ये गुंडागर्दीचे प्रमाण वाढत असतानाच अशोकस्तंभ परिसरात असलेल्या खासगी क्लासच्या विद्यार्थ्यांच्या दोन गटांत तुफान फ्री स्टाईल हाणामारी झाली. या प्रकारामुळे परिसरातील वाहनधारक व पादचारी, तसेच व्यावसायिकांमध्ये काही काळ घबराट पसरली; मात्र या फ्री स्टाईल हाणामारीचे कारण समजू शकले नाही.
पोलीस आयुक्तालयापासून जवळच असलेल्या अशोकस्तंभ परिसरात खासगी क्लासेसची संख्या मोठी आहे. त्यामुळे पोलिसांनी अशा घटनांची तातडीने दखल घ्यावी, अशी अपेक्षा उपस्थित नागरिक आणि व्यावसायिकांनी व्यक्त केली.
Copyright ©2025 Bhramar