Kolkata Rape-Murder Case: इंडियन मेडिकल असोसिएशनकडून 15 ऑक्टोबर  रोजी देशव्यापी उपोषणाची घोषणा
Kolkata Rape-Murder Case: इंडियन मेडिकल असोसिएशनकडून 15 ऑक्टोबर रोजी देशव्यापी उपोषणाची घोषणा
img
दैनिक भ्रमर
कोलकाता येथे महिला प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याची संतापजनक घटना घडली होती. दरम्यान, या घटनेच्या निषधार्थ रुग्णालयातील कनिष्ठ डॉक्टरांचे आमरण उपोषण आंदोलन सुरू आहे. आतापर्यंत तीन जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

कोलकाता येथे डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या केल्या प्रकरणी आरोपींवर अद्याप कोणतीही कठोर कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे इंडियन मेडिकल असोसिएशनने 15 ऑक्टोबर रोजी देशव्यापी उपोषणाची घोषणा केली आहे. आयएमएने रविवारी एका निवेदनात म्हटले आहे.

दरम्यान , मंगळवारी 15 ऑक्टोबर रोजी सकाळी 6 ते संध्याकाळी 6 दरम्यान उपोषणाचे आयोजन करण्यात आले आहे. आयएमएने पत्रात नमूद केले की, आरव्ही अशोकन यांनी उपोषण करणाऱ्या तरुण डॉक्टरांची भेट घेतली. त्यांनी तरुण डॉक्टरांना सक्रिय पाठिंबा दर्शवला आहे.

कोलकाता डॉक्टर बलात्कार आणि खून प्रकरणानंतर अद्याप तेथे वातावरण जैसेथेच आहे. त्यात कोणताही बदल झालेला नाही. आतापर्यंत तीन जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. देशव्यापी कारवाईचे नेतृत्व आयएमए ज्युनियर डॉक्टर्स नेटवर्क आणि मेडिकल स्टुडंट्स नेटवर्क करतील, असे आयएमएने रविवारी एका निवेदनात म्हटले आहे.  

 तसेच , आयएमएने देशातील सर्व पदाधिकारी आणि निवासी डॉक्टरांनाही उपोषणात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. डॉक्टरांच्या संस्थेने नमूद केले आहे की उपोषण / निषेधाचे ठिकाण "त्यांच्या वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये किंवा कॅम्पसजवळ असावे".


/div>



इतर बातम्या
Join Whatsapp Group