आजकाल गुन्हेगारीत चिंताजनक वाढ झाली असून कायद्याचा धाक झुगारत काही लोक हत्ये सारखे मोठे गुन्हे करत आहेत. अतिशय शुल्लक अशा करणावरूनही राग डोक्यात ठेऊन काही लोक हत्ये सारख्या क्रूर मार्गाचा अवलंब करतात. अशीच एक धक्कादायक घटना भंडारा जिल्ह्यात घडली आहे. एका मालकानेअपशब्द वापरले म्हणून चाकू भोसकून कामगाराची हत्या केली असल्याची घटना घडली आहे.
वरठी येथील पडोळे भोजनालयात कामाला असलेल्या एका कामगाराचा मृतदेह नदीत आढळून आला होता. पोलिसांनी याचा तपास केला असता धक्कादायक माहिती समोर आली आहे. यात कामगाराने मालकाला अपशब्द बोलल्याने चाकूने भोसकून कामगाराची हत्या केल्याचे समोर आले आहे. भंडारा जिल्ह्यातील वरठी येथे हि धक्कादायक घटना घडली असून गोपाल बावनकर (वय 40, मूळ राहणार अर्जुनी, तिरोडा) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. दरम्यान गोपाल याचा मृतदेह दाभा येथील सूर्य नदीपात्रात तरंगताना आढळून आला. सकाळी फिरायला गेलेल्या तरुणांनी याची माहिती पोलिसांना दिली होती. त्यानंतर वरठी पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह पाण्याबाहेर काढत ओळख पटवण्यासाठी प्रयत्न सुरू केले.
दरम्यान, सदर व्यक्तीची ओळख पटली असून तो वरठी येथील पडोळे भोजनालयात कामाला होता. व्यसनाच्या भरात त्याने मालकाला (Crime News) अपशब्द बोलण्याच्या कारणावरून मालकाने चाकू भोसकून त्याची हत्या केली. त्यानंतर मध्यरात्रीच्या दरम्यान त्याचा मृतदेह चारचाकी वाहनाच्या डिक्कीत घालून दाभा परिसरातील सुर नदी पात्रात फेकण्यात आला. दरम्यान यावेळी त्याच्यासोबत आणखीन सहकारी असल्याच्या संशय असून याप्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. तर पुढील तपास व कारवाई वरठी पोलीस करीत आहेत.