
राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी पुणे जिल्ह्यातील शिरुर येथे एका कार्यक्रमात बोलताना 'शरद पवार साहेब आणि मी तेव्हाही वेगवेगळे नव्हतो आणि आजही नाही आहे, त्यामुळे काळजी करू नका', असं वक्तव्य केलं आहे. त्याच्या या वक्तव्याने राज्याच्या राजकारणात चर्चेला उधाण आलं आहे.
राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि इतर ८ नेत्यांनी राज्यातील शिवसेने-भाजप सरकारला पाठिंबा दिला. अजित पवारांसह ८ नेत्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली.त्यानंतर राष्ट्रवादीत मोठी फुट पडली आहे. राष्ट्रवादीत दोन गट निर्माण झाले आहेत. फुटीनंतर अजित पवार गटातील नेत्यांनी शरद पवारांवर टीका केली होती. त्यानंतर पहिल्यांदाच अजित पवार , शरद पवार एका कार्यक्रमानिमीत्त एकाच व्यासपीठावर दिसुन आले. त्याआधी पुणे जिल्ह्यातील शिरुर येथे एका कार्यक्रमात बोलताना 'शरद पवार साहेब आणि मी तेव्हाही वेगवेगळे नव्हतो आणि आजही नाही आहे, त्यामुळे काळजी करू नका', असं वक्तव्य केलं आहे. त्याच्या या वक्तव्याने राज्याच्या राजकारणात चर्चेला उधाण आलं आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज शिरूर-हवेलीचे माजी आमदार दिवंगत बाबुराव पाचार्णे यांच्या स्मारकाचे उद्घाटन झाले. यावेळी त्यांनी शिरुर विधानसभा मतदार संघाच्या निवडणूकीवेळी शरद पवारांचे समर्थक म्हणुन पोपटराव गावडे तर बाबुराव पाचर्णे अजित पवारांचे समर्थक असल्याचा शिरुरमध्ये प्रचार झाल्याचे खुद्द अजित पवारांनी सांगत दाखला दिला. मात्र आम्ही त्यावेळीही वेगवेगळे नव्हतो आणि आजही नाही काळजी करु नका असे सांगत अजित पवारांनी मोठं वक्तव्य केलं आहे.
त्याचबरोबर अजित पवारना सकाळी लवकरच कामाला सुरवात करतात, याबाबत विचारले असता त्यांनी आपल्याला शरद पवारांनी ही सवय लावली असल्याचे सांगितले आहे. अजित पवार म्हणाले, "सकाळी लवकर कामाला सुरवात करण्याची सवय शरद पवारांनी लावली. म्हणूनच सकाळी सात वाजताच कामाला सुरवात करीत असतो."