नाशिक (भ्रमर प्रतिनिधी):- चहा करीत असताना गॅसजवळ असलेल्या कापडी पडद्याने अचानक पेट घेतल्यामुळे एकाच कुटुंबातील पाच सदस्य भाजल्याची घटना वडाळा रस्त्यावरील हिरवेनगरातील खान पॅलेसच्या प्लॉट क्रमांक ४ मध्ये घडली आहे. पाचही सदस्यांवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दादासाहेब गायकवाड सभागृहाजवळ असलेल्या वडाळा रस्त्यावरील खान पॅलेसमध्ये शुक्रवार (दि. २९) सकाळी ७ वाजता ही दुुर्घटना घडली. त्यामध्ये आसिफ आमीन खान (५२), गजाला आसिफ खान (४०), अफ्फान आसिफ खान (२०) व इब्राहिम आसिफ खान (१३) हे पाच जण जखमी झाले. पाचही जणांच्या दोन्ही हातांना, चेहर्याला दुखापत झाली आहे. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात प्रथमोपचार केल्यानंतर जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.