आनंदाची बातमी :  केंद्र सरकारची आणखी एक योजना, महिलांना मिळणार
आनंदाची बातमी : केंद्र सरकारची आणखी एक योजना, महिलांना मिळणार "इतके" रुपये
img
Dipali Ghadwaje
केंद्र सरकारकडून देशातील नागरिकांसाठी खूप साऱ्या योजना आणल्या जातात. महिलांच्या सशक्तीकरणासाठी सरकारने आणखी एक योजना आणली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सोमवार 9 डिसेंबर रोजी त्यांच्या हरियाणा दौऱ्यात बीमा सखी योजना लाँच करणार आहेत. या योजनेच्या माध्यमातून महिलांचे सक्षमीकरण आणि आर्थिकदृष्ट्या स्वावंलबी बनवण्यासाठी ही योजना राबवण्यात येणार आहे. 

पीएमओकडून जारी करण्यात आलेल्या पत्रकानुसार, बीमा सखी योजना ही भारतीय जीवन बीमा निगम  चीच एक योजना आहे. ही योजन पंतप्रधान मोदींच्या हस्ते पानीपतमध्ये लाँच करण्यात येणार आहे. बीमा सखी योजनेच्या माध्यमेतून दहावी पास असलेल्या 18 ते 70 वर्षांपर्यंतच्या महिलांच्या सशक्तीकरणासाठी बळ मिळणार आहे.

या योजनेंतर्गंत साक्षरता आणि वीमा जागरुकतेला बढावा देण्यासाठी महिलांना 3 वर्षांपर्यंत स्पेशल ट्रेनिंग देण्यात येईल. तसंच, या काळात महिलांना स्टायपेंडही मिळणार आहे. 

या योजनेअंतर्गंत आगामी तीन वर्षात 2 लाख महिलांना स्वावलंबी बनवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. तीन वर्षांचा कालावधी संपल्यानंतर महिला एलआयसी एजंट म्हणून काम करु शकणार आहेत. तसंच, पदवीपर्यंतचे शिक्षण घेतलेल्या विमा सखींना एलआयसीमध्ये डेव्हलपमेंट ऑफिसर या पदावर काम करण्याची संधी दिली जाणार आहे. 

स्टायपेंड किती मिळणार?

या योजनेच्या सुरुवातीला महिलांना प्रत्येक महिलेला 7 हजार रुपये दिले जातील. तर, दुसऱ्या वर्षी या रक्कम कमी करुन 6 हजारापर्यंत दिले जातील. तर तिसऱ्या दिवशी प्रत्येक महिन्याला 5 हजार रुपये देण्यात येतील. तसंच, ज्या विमा सखी त्यांचे टार्गेट पूर्ण करतील त्यांना वेगळे कमीशन दिले जाईल. योजनेच्या पहिल्या टप्प्यात 35 हजार महिलांना विमा एजेंट म्हणून रोजगार दिला जाणार आहे. त्यानंतर 50 हजार आणखी महिलांना योजनेचा लाभ घेता येणार आहे. 

 
इतर बातम्या
Join Whatsapp Group