प्रेमप्रकरणातुन शिक्षिकेची हत्या करणाऱ्या आरोपीस जन्मठेप; नाशिक जिल्ह्यातील घटना
प्रेमप्रकरणातुन शिक्षिकेची हत्या करणाऱ्या आरोपीस जन्मठेप; नाशिक जिल्ह्यातील घटना
img
दैनिक भ्रमर
  लासलगाव :- प्रेमप्रकरणातुन शिक्षिकेच्या घरात जाऊन चाकुने वार केले व स्वत: अंगावर वार करुन घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपात मुकेश गोपाळ साबळे रा कसबा पेठ पुणे यांस दोषी ठरविण्यात येऊन निफाडचे जिल्हा व सत्र न्यायाधीश बी डी पवार यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे 

लासलगांव ता निफाड येथे पिडीत  भाड्याच्या खोलीत राहुन वळदगांव ता येवला येथे जिल्हा परिषद शाळेत शिक्षिका म्हणुन काम करत होती 4 जुलै 2014 रोजी पिडित राहत असलेल्या भाड्याच्या खोलीतील मालक सुनंदा शिसव ह्यांनी रुपेश वडनेरे यास वरिल मजल्यावर पिडितेस कोणीतरी मारत असल्याचे सांगितले होते त्यानुसार रुपेश वडनेरे यांनी प्रत्यक्ष जाऊन पाहिल्यावर घरात पिडित शिक्षिकेच्या गळ्यावर व कंबरेवर वार झालेले होऊन ती रक्ताचे थारोळ्यात पडल्याचे दिसले होते तर आतमध्ये मारेकरी आरोपी मुकेश साबळे यास कोंडुन घेत लासलगांव पोलिसांना माहिती दिल्यावर पोलिसांनी घटनास्थळावर येऊन पिडित शिक्षिकेचा मारेकरी कोंडलेला दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला मात्र मारेकरी मुकेश साबळे याने दरवाजा आतमधुन बंद केलेला होता त्यानंतर दरवाजा तोडुन पोलिस आत गेले त्यावेळी मारेकरी आरोपीने स्वत: वर वार करुन बेशुध्द करुन घेतल्याने बेशुध्द होता तर पिडीत शिक्षिका मयत झालेली होती.

घटनास्थळावरुन कोयता ,सुरा व  चिठ्ठी जप्त करण्यात आले होती याबाबत लासलगांव पोलिसांत रुपेश वडनेरे यांचे फिर्यादीवरुन आरोपी मुकेश गोपाळ साबळे यांचेविरुध्द भादवि कलम 302 व 309 अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला तपासाअंती आरोपपत्र निफाडच्या जिल्हा व सत्र न्यायालयात दाखल करण्यात आले सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकिल सुषमा बंगले यांनी फिर्यादी ,तपास अधिकारी विनोद पाटील यांचेसह एकुण सतरा साक्षीदारांची साक्ष नोंदविली.

या खटल्यात पैरवी अधिकारी म्हणुन पोलिस हवालदार विजय पैठणकर यांनी काम पाहिले न्यायालयासमोर आलेल्या साक्षीपुराव्यावरुन न्यायाधीश बी डी पवार यांनी आरोपी मुकेश गोपाळ यास भादवि कलम 302 अन्वये  जन्मठेप व पाच हजार रुपये दंड, दंड न भरल्यास सहा महिने कारावास, भादवि कलम 309 अन्वये सहा महिने कारावास व एक हजार रुपये दंड ,दंड न भरल्यास एक महिना कारावास अशी शिक्षा सुनावली आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group