भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू लग्नबंधनात अडकली आहे. राजस्थानमधील उदयपूर याठिकाणी डेस्टिनेशन विवाहसोहळा पार पडला. पी. व्ही. सिंधूने बिझनेसमन वेंकट दत्ताशी लग्न करत आयुष्याच्या नव्या प्रवासाची सुरुवात केली आहे.
या दोघांच्या लग्नाचा पहिला फोटो समोर आला आहे. हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यावर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. पी. व्ही. सिंधू आणि वेंकट दत्ता यांनी हिंदू विवाहपद्धतीनुसार लग्न केलंय.
यावेळी तिने चंदेरी रंगाची साडी नेसली होती आणि त्यावर भरजरी दागिने घातले होते. तर वेंकटने त्याच रंगसंगतीचा कुर्ता आणि धोती परिधान केली आहे.
सोशल मीडियावरील या व्हायरल फोटोमध्ये पी. व्ही. सिंधू आणि वेंकट हात जोडून नमस्कार करताना दिसत आहेत.