टीम इंडियाचा माजी फलंदाज विनोद कांबळीची तब्येत अचानक बिघडली आहे. त्यानंतर विनोद कांबळीला शनिवारी रात्री ठाण्यातील आकृती रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्या त्याच्यावर डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरु आहेत. त्यांचे सर्व प्रकारच्या चाचण्या करण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी विनोद कांबळीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
या व्हिडिओमध्ये विनोद कांबळी हा सचिन तेंडुलकरसोबत बोलताना दिसत होता. या व्हिडिओमध्ये विनोद कांबळीची तब्येत बिघडल्याची दिसून येत आहे. या व्हायरल व्हिडिओनंतर माजी क्रिकेटपटू कपिल देव यांनी मदतीसाठी पुढे आले होते.
१९९१ साली केलं होतं डेब्यू विनोद कांबळीने १९९१ साली भारतीय वनडे क्रिकेटमध्ये डेब्यू केलं होतं. त्यांनी टीम इंडियासाठी टेस्टमध्ये १९९३ साली डेब्यू केलं होतं. विनोद कांबळीने आंतरराष्ट्रीय करिअरमध्ये दमदार सुरुवात केली होती. तो भारतासाठी कसोटी सामन्यात सर्वाधिक जलद १००० धावा करणारा फलंदाज ठरला होता. त्याने १४ डावांमध्येच हा कारनामा केला होता.
मात्र, यानंतर त्याचा प्रदर्शन खराब झालं. टीम इंडियासाठी विनोद कांबळीने १७ कसोटी सामने खेळले आहेत. त्यातील १७ सामन्यात १०८४ धावा केल्या आहेत. कसोटी सामन्यात ४ शतक आणि ३ अर्धशतक ठोकले आहेत. या व्यतिरिक्त वनडे क्रिकेटमध्ये १०४ सामन्यात एकूण २४७७ धावा केल्या होत्या. यानंतर विनोद कांबळीला सातत्याने होणाऱ्या खराब कामगिरीमुळे टीम इंडियातून बाहेर पडावं लागलं.