लाडक्या बहिणींसाठी सरकारचा मोठा निर्णय  ! ''त्या'' महिलांना देखील मिळणार हफ्ता, वाचा सविस्तर
लाडक्या बहिणींसाठी सरकारचा मोठा निर्णय ! ''त्या'' महिलांना देखील मिळणार हफ्ता, वाचा सविस्तर
img
दैनिक भ्रमर
राज्यातील बहुचर्चित मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे  जुलैपासून ते नोव्हेंबरपर्यंतचे पाच हप्ते आतापर्यंत या योजनेतील लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. राज्यात महायुतीचे सरकार निवडून आले तर बहिणींचा हफ्ता २१०० रुपये करू असे आश्वासन महायुतीकडून देण्यात आले. आता राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाले असून आता डिसेंबरचे पैसे कधी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. 

दरम्यान,  आजपासून लाडकी बहीण योजनेच्या डिसेंबर महिन्याचा हप्ता वितरणाला सुरुवात झाली असून पुढीच चार ते पाच दिवसांमध्ये सर्व लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा होण्याची शक्यता आहे. दरम्यान आजपासून डिसेंबरचा हप्ता मिळण्यास सुरुवात झाली आहे. 

तर दुसरीकडे सरकारनं या योजनेबाबत मोठा निर्णय घेतला आहे. ज्या महिलांना बँक खात्याला आधार कार्ड लिंक नसल्यामुळे पैसे मिळण्यास अडचण आली होती, आता आशा महिलांना देखील पुढील चार ते पाच दिवसांत पैसे मिळणार आहेत. याबाबत मंत्री आदिती तटकरे यांनी माहिती दिली आहे.


इतर बातम्या
Join Whatsapp Group