प्राजक्ता माळीविषयी केलेल्या वक्तव्याप्रकरणी धसांकडून दिलगिरी ; सुरेश धस यांच्या माफीनंतर प्राजक्ताचा VIDEO, हात जोडत म्हणाली...
प्राजक्ता माळीविषयी केलेल्या वक्तव्याप्रकरणी धसांकडून दिलगिरी ; सुरेश धस यांच्या माफीनंतर प्राजक्ताचा VIDEO, हात जोडत म्हणाली...
img
Dipali Ghadwaje
मुंबई : भाजप आमदार सुरेश धस यांनी अभिनेत्री प्राजक्ता माळीचं नाव घेऊन मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर टीका केली. या टीकेनंतर एकच घमासान उठलं.

अभिनेत्री प्राजक्ता माळीवर प्रचंड टीका झाली. झालेल्या टीकेनंतर प्राजक्ता माळीने महिला आयोगात धाव घेत तक्रार केली. त्याचप्रमाणे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेतली. त्याचप्रमाणे पत्रकार परिषद घेत सुरेश धस यांनी माफी मागावी अशी मागणी करत संपूर्ण प्रकराचा निषेध केला.

आमदार सुरेश धस यांनी प्राजक्ताची माफी मागितली. झालेल्या संपूर्ण प्रकरणानंतर दोघांकडून एक पाऊल मागे घेण्यात आलं आहे. सुरेश धस यांच्यानंतर अभिनेत्री प्राजक्ता माळीने व्हिडिओ शेअर केला आहे. या प्रकरणावर प्राजक्ताकडून पडदा टाकण्यात आला आहे. अभिनेत्रीने व्हिडिओ शेअर करत ही माहिती दिली आहे.

प्राजक्ता माळीने म्हटलंय, “तुम्हा सगळ्यांना माझा नम्रतापूर्वक नमस्कार. सबंध महाराष्ट्राचे मी सर्वप्रथम मनापासून आभार मानते. पत्रकार परिषद घेतल्याक्षणापासून ते आता पर्यंत मी आणि माझे कुटुंबीय आणि शेकडो फोन कॉल मेसेज सोशल मीडिया टॅग्स रिसिव्ह केलेत.  महिलांच्या सन्मानासाठी समाजातल्या सर्व स्तरांमधून आवाज उठवला गेला. पाठिंबा दिला गेला, समर्थन दिलं गेलं. त्यामुळे आम्हाला फार बळ मिळालं. समाधान वाटलं खूप खूप धन्यवाद.”
 
प्राजक्ता पुढे म्हणाली, “मलाही आमदार श्री. सुरेश धस यांचा देखील मनापासून आभार मानते. अत्यंत मोठ्या मनाने त्यांनी देखील समस्त महिलावर्गाची माफी मागितली, दिलगीरी व्यक्त केली. दादा खूप धन्यवाद. असं करून तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचे पाईक आहात हे दाखवून दिलं.

छत्रपतींची भूमिका महिलांच्या सन्मानासाठी किती कठोर होती हे आपण सगळे जाणतो. आणि हे छत्रपतींचे भूमी आहे आणि त्यांचे विचार पुढे चालवले जातील हेच तुमच्या कृतीतून दाखवून दिले आहे. धन्यवाद. 

याचबरोबर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस यांची देखील मनापासून आभार मानते.  त्यांनी जातीनं लक्ष घातलं आणि अत्यंत निगुतीने संवेदनशील विषय पुढे नेला आणि मार्गी लावला. मनापासून धन्यवाद.

त्याचबरोबर महाराष्ट्र महिला आयोग आणि आयोगाचे अध्यक्ष माननीय रुपालीताई चाकणकर यांचा देखील मनापासून आभार. त्यांनी देखील त्वरित त्यावर कारवाई केली , असंही प्राजक्ता म्हणाली.
 
व्हिडीओच्या शेवटी प्राजक्ता म्हणाली,आज मी इथे हेही नमूद करू इच्छिते की आमदार साहेबांनी माफी मागितल्यामुळे आता मी त्यांच्यावर कोणतीही कायदेशीर कारवाई करणार नाही आणि करू इच्छित नाही. आणि आज या संपूर्ण प्रकरणावर माझ्याकडूनही पडदा टाकते आहे.

 
इतर बातम्या
Join Whatsapp Group