मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार 2024 ची घोषणा : मनू भाकर, डी गुकेश, हरमनप्रीत सिंग अन् प्रवीण कुमार यांचा समावेश
मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार 2024 ची घोषणा : मनू भाकर, डी गुकेश, हरमनप्रीत सिंग अन् प्रवीण कुमार यांचा समावेश
img
Dipali Ghadwaje
बुद्धिबळ विश्वविजेता डी गुकेश, एकाच ऑलिम्पिकमध्ये दोन पदके जिंकणारी नेमबाज मनू भाकर, भारतीय पुरुष हॉकी संघाचा कर्णधार हरमनप्रीत सिंग आणि पॅरालिम्पिक सुवर्णपदक विजेता प्रवीण कुमार यांना मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार 2024 ने सन्मानित केले जाणार आहे.

क्रीडा मंत्रालयाने 2 जानेवारी 2025 रोजी ही घोषणा केली. सर्व विजेत्यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते 17 जानेवारी 2025 रोजी राष्ट्रपती भवनात आयोजित कार्यक्रमात गौरविण्यात येईल.

क्रीडा मंत्रालयाने सांगितले की, क्रीडा पुरस्कारांसाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीच्या शिफारशींचे परीक्षण आणि तपासणी केल्यानंतर सरकारने खेळाडू आणि प्रशिक्षकांना पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला आहे.

समित्यांनी केलेल्या शिफारशींच्या आधारे सरकारने मनू भाकर, डी गुकेश, हरमनप्रीत सिंग आणि पॅरा ॲथलीट प्रवीण कुमार यांना खेलरत्नने सन्मानित करण्याचा निर्णय घेतला आहे.
 

क्रीडा मंत्रालयाने अर्जुन पुरस्काराने सन्मानित होणाऱ्या एकूण 32 खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. यामध्ये 17 पॅरा ॲथलीट आहेत.

मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार 2024
गुकेश डी (बुद्धिबळ)
हरमनप्रीत सिंह (हॉकी)
प्रवीण कुमार (पॅरा-ॲथलेटिक्स)
मनु भाकर (शूटिंग)
क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीसाठी अर्जुन पुरस्कार

ज्योती येराजी (ऍथलेटिक्स)
अन्नू राणी (ऍथलेटिक्स)
नितू (बॉक्सिंग)
सविती (बॉक्सिंग)
वंतिका अग्रवाल (बुद्धिबळ)
सलीमा टेटे (हॉकी)
अभिषेक (हॉकी)
संजय (हॉकी)
जर्मनप्रीत सिंह (हॉकी)
सुखजीत सिंह (हॉकी)
राकेश कुमार (पॅरा-तिरंदाजी)
प्रीती पाल (पॅरा-ॲथलेटिक्स)
जीवनजी दीप्ती (पॅरा-ॲथलेटिक्स)
अजित सिंह (पॅरा-ॲथलेटिक्स)
सचिन सर्जेराव खिलारी (पॅरा-ॲथलेटिक्स)
धरमबीर (पॅरा-ॲथलेटिक्स)
प्रणव सूरमा (पॅरा-ॲथलेटिक्स)
एच होकातो सेमा (पॅरा-ॲथलेटिक्स)
सिमरन (पॅरा-ॲथलेटिक्स)
नवदीप (पॅरा-ॲथलेटिक्स)
नितेश कुमार (पॅरा-बॅडमिंटन)
सुश्री तुलसीमाथी मुरुगेसन (पॅरा-बॅडमिंटन)
नित्या श्री सुमथी सिवन (पॅरा-बॅडमिंटन)
मनिषा रामदास (पॅरा-बॅडमिंटन)
कपिल परमार (पॅरा-जुडो)
मोना अग्रवाल (पॅरा-शूटिंग)
सुश्री रुबिना फ्रान्सिस (पॅरा-शूटिंग)
स्वप्नील सुरेश कुसळे (शूटिंग)
सरबज्योत सिंह (शूटिंग)
अभय सिंह (स्क्वॅश)
साजन प्रकाश (स्विमिंग)
अमन (कुस्ती)
क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीसाठी अर्जुन पुरस्कार (आजीवन श्रेणी)

सुचा सिंह (ऍथलेटिक्स)

मुरलीकांत राजाराम पेटकर (पॅरा-स्विमिंग)

उत्कृष्ट प्रशिक्षकांसाठी द्रोणाचार्य पुरस्कार

सुभाष राणा (पॅरा-शूटिंग)

दीपाली देशपांडे (शूटिंग)

संदीप सांगवान (हॉकी)

उत्कृष्ट प्रशिक्षकांसाठी द्रोणाचार्य पुरस्कार (आजीवन श्रेणी)

एस मुरलीधरन (बॅडमिंटन) 

अरमांडो अग्नेलो कोलाको (फुटबॉल)

गुकेश डी : चेस वर्ल्ड चॅम्पिअन

हरमनप्रीत सिंह : ऑलिम्पिक ब्राँज मेडलिस्ट हॉकी संघाचा कप्तान

मनू भाकर : ऑलिम्पिक शूटिंग स्पर्धेत दोन ब्राँझ मेडलिस्ट 

प्रविण कुमार : पॅराएथलीट - गोल्ड मेडलिस्ट उंच उडी

सचिन खिलारी आणि स्वप्निल कुसाळेला अर्जुन पुरस्कार

दीपाली देशपांडे यांना द्रोणाचार्य पुरस्कार

 
इतर बातम्या
Join Whatsapp Group