मोठी बातमी ! चीनमधील विषाणू भारतात दाखल?
मोठी बातमी ! चीनमधील विषाणू भारतात दाखल? "या" ठिकाणी आढळला एचएमपीव्हीचा पहिला रूग्ण
img
Dipali Ghadwaje
चीनमध्ये HMPV व्हायरसने धुमाकूळ घातला आहे. अशातच आता भारतात देखील एचएमपीव्ही व्हायरसचा रूग्ण सापडला आहे. HMPV व्हायरस भारतात पोहोचला असून त्याचा पहिला रूग्ण बेंगळुरूमध्ये नोंदवण्यात आढळला असल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार , बंगळुरू मधील रुग्णालयात एका आठ महिन्यांच्या मुलीमध्ये HMPV च्या व्हायरसची लागण झाल्याचं आढळून आलं आहे.

दरम्यान आरोग्य मंत्रालयाच्या सांगण्यानुसार, त्यांच्या लॅबमध्ये याची चाचणी केली गेली नाही. या प्रकरणाचा रिपोर्ट एका खासगी रुग्णालयात करण्यात आला आहे. HMPV व्हायरस हा सहसा फक्त लहान मुलांमध्ये आढळतो. सर्व फ्लू नमुन्यांपैकी 0.7 टक्के एचएमपीव्हीचा वाटा आहे.

या व्हायरसची लक्षणं काय आहेत?

या व्हायरसला मेटाप्युमोव्हायरस किंवा एचएमपीव्ही असं म्हटलं जातं. ज्याची लक्षणे सामान्य सर्दीसारखी असतात. सामान्य प्रकरणांमध्ये यामुळे खोकला, नाक वाहणं किंवा घसा खवखवणं यांसारखी लक्षणं दिसून येतात. एचएमपीव्ही संसर्ग लहान मुलं आणि वृद्धांमध्ये गंभीर असू शकतो. या व्हायरसमुळे रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत असलेल्या लोकांमध्ये गंभीर आजार होऊ शकतो.
 
HMPV | chine |
इतर बातम्या
Join Whatsapp Group