तिरुपती मंदिरात चेंगराचेंगरी ; सहा भाविकांचा मृत्यू , कशामुळे घडली दुर्घटना?
तिरुपती मंदिरात चेंगराचेंगरी ; सहा भाविकांचा मृत्यू , कशामुळे घडली दुर्घटना?
img
Dipali Ghadwaje
हैदराबाद : जगभरात प्रसिद्ध असलेल्या आंध्र प्रदेशातील तिरुपती मंदिरात चेंगराचेंगरीची मोठी दुर्घटना घडली आहे. मंदिरातील वैकुंठ द्वार दर्शन तिकीट केंद्राजवळ बुधवारी झालेल्या चेंगराचेंगरीत सहा भाविकांचा मृत्यू झाला. तर 40 भाविक जखमी झाले आहेत.

बुधवारी सकाळपासूनच तिरुपतीच्या विविध तिकीट केंद्रांवर हजारो भाविक वैकुंठ द्वार दर्शनाचे टोकन घेण्याकरिता रांगेत उभे होते. टोकन घेण्यासाठी मोठ्या संख्येनं भाविकाची गर्दी झाल्यानंतर चेंगराचेंगरीची दुर्घटना घडली. दुर्घटनेनंतर पोलिसांनी भाविकांना सुरक्षितपणे बाहेर काढले. अपघातानंतर तिरुपती पोलिसांनी तातडीनं परिस्थिती नियंत्रणात आणली.

कशामुळे घडली दुर्घटना? 

तिरुपती देवस्थानाकडून वैकुंठ द्वाराचं दर्शन दहा दिवसांसाठी खुलं करण्यात येणार आहे. त्यासाठी या महिन्याच्या 10, 11 आणि 12 तारखेला वैकुंठ द्वार सर्व दर्शन टोकन जारी केले जाणार आहेत. गुरुवारी पहाटे 5 वाजल्यापासून टोकन दिले जाणार असल्याची तिरुपती देवस्थान ट्रस्टनं घोषणा केली होती.

त्यामुळे हजारो भाविकांनी टोकन घेण्याकरिता गर्दी केली होती. भाविकांना वैरागी पट्टीडा पार्क येथील रांगेत थांबण्याचं आवाहन केल्यानंतर चेंगराचेंगरीची दुर्घटना घडल्याचं सांगण्यात येत आहे.

दुर्घटनेवर आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी कार्यालयाकडून दु:ख व्यक्त करण्यात आलं.
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group