सध्या सणासुदीचे दिवस सुरु झाले आहे. सणासुदीच्या दिवशी अनेकजण सोने-चांदीचे दागिने खरेदी करतात. सोन्याच्या किंमती दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सोन्याचे भाव वाढल्याने खरेदीदारांच्या खिशाला चांगलाच फटका बसत आहे. ऐन लग्नसराईच्या दिवसात सोन्याचे भाव वाढत असल्याने खरेदीदारांची निराशा झाली आहे.
सोन्याचे भाव
२४ कॅरेट सोने सध्या १ ग्रॅम सोन्याची किंमत ८,००७ रुपये आहे. ८ ग्रॅम सोन्याची किंमत ६४,०५६ रुपये आहे. १० ग्रॅम म्हणजेच एक तोळा सोन्याची किंमत ८०,०७० रुपये आहे. एक तोळा सोन्याच्या किंमतीत ११० रुपयांनी वाढ झाली आहे.
२२ कॅरेट सोन्याची किंमत
१ ग्रॅम सोन्याची किंमत ७,३४० रुपये आहे. ८ ग्रॅम सोन्याची किंमत ५८,७२० रुपये आहे. १० ग्रॅम सोन्याची किंमत ही ७३,४०० रुपये आहे. १ तोळा सोन्याच्या किंमतीत १०० रुपयांनी वाढ झाली आहे.
१८ कॅरेट सोन्याची किंमत
१ ग्रॅम सोन्याची किंमत ६,००६ रुपये आहे. ८ ग्रॅम सोन्याची किंमत ४८,०४८ रुपये आहे. १ तोळा सोन्याची किंमत ६०,०६० रुपये आहे.
चांदीचे भाव
आज चांदीचे भावदेखील वाढले आहे. सोन्यासह चांदीच्या किंमती वाढल्याने खरेदीदारांच्या खिशाला आणखी चाप बसणार आहे. आज ८ ग्रॅम चांदी ७४८ रुपयांना विकली जात आहे. १० ग्रॅम चांदीची किंमत ९३५ रुपये आहे. १०० ग्रॅम चांदीची किंमत ९,३५० रुपये आहे.