जीवघेण्या हल्ल्यानंतर सैफ अली खानला अखेर डिस्चार्ज , डॉक्टरांनी दिला
जीवघेण्या हल्ल्यानंतर सैफ अली खानला अखेर डिस्चार्ज , डॉक्टरांनी दिला "हा" सल्ला
img
Dipali Ghadwaje
अभिनेता सैफ अली खान याच्यावर प्राणघातक हल्ला झाल्यानंतर अभिनेत्याला लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. 16 जानेवारी रोजी अभिनेत्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. आता अभिनेत्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती देखील समोर आली आहे.

पण अभिनेत्याला डॉक्टरांनी काही दिवस आराम करण्याचा सल्ला दिला आहे. शिवाय डॉक्टर देखील त्याच्यासाठी महत्त्वाच्या कामाला लागले आहेत. डॉक्टरांच्या टीमने सैफ अली खानला घरी घेऊन जाण्यासाठी परवानगी दिली आहे. अभिनेत्याला डिस्चार्ज मिळाला आहे.

मात्र, सैफला घरी कधी घेवून जायचं हा निर्णय अभिनेत्याचे कुटुंबिय घेणार आहेत. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, सैफ आता चालू शकतो, बोलू शकतो, पण पूर्ण बरे होण्यासाठी एक महिना लागेल. म्हणजे डॉक्टरांनी सांगितल्यानुसार अभिनेत्याला पूर्णपणे बरं होण्यासाठी 1 महिना लागणार आहे.

पाठीवर झालेल्या प्लास्टिक सर्जरीनंतर सैफला पूर्णपणे बरं होण्यासाठी एक महिना लागणार असल्याची माहिती समोर येत आहे. डॉक्टरांनी सैफला पूर्णपणे आराम करण्याचा सल्ला दिला असून जड वस्तू उचलणे, व्यायाम करणे आणि शूटिंग करणे टाळन्याचा सल्ला दिला आहे. तर औषधांचे वेळापत्रक लिलावती हॉस्पिटलमध्ये तयार केले जात आहे.

डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार अभिनेत्याला लवकरच डिस्चार्ज मिळेल. पण अभिनेता काही दिवस चालू फिरू शकणार नाही. सैफच्या जखमा अद्याप बऱ्या झालेल्या नाहीत, त्यामुळे अभिनेत्याला त्याच्या कुटुंबातील सदस्यांव्यतिरिक्त इतर लोकांना भेटण्यास मनाई करण्यात आली आहे, कारण जखमा बऱ्या झाल्या नाहीत तर संसर्गाचा धोका असू शकतो.
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group