Nashik Crime : लग्नाचे आमिष दाखवून १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार; शिक्षणासाठी तो राहत होता तिच्याच घरात
Nashik Crime : लग्नाचे आमिष दाखवून १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार; शिक्षणासाठी तो राहत होता तिच्याच घरात
img
दैनिक भ्रमर

नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- लग्नाचे आमिष दाखवून १६ वर्षीय अल्पवयीन मुलीच्या इच्छेविरुद्ध तिच्यावर लैंगिक अत्याचार करून तिची फसवणूक करणार्‍या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी पीडिता ही अल्पवयीन असून, श्रमिकनगर परिसरात राहते. आरोपी यश अभिमान सोनवणे (वय 20, रा. अंबासन, ता. बागलाण) याने भविष्यात लग्न करण्याचे आमिष दाखवून पीडितेशी मैत्री करून तिचा विश्‍वास संपादन केला.

पीडिता ही अल्पवयीन असल्याचे माहीत असतानाही पीडितेच्या इच्छेविरुद्ध सोनवणे याने जबरदस्तीने तिच्यावर अत्याचार केले. त्यानंतर नोकरीचे कारण सांगून तो कुठे तरी निघून गेला. यामुळे आपली फसवणूक झाल्याची बाब लक्षात आल्यानंतर पीडितेने सातपूर पोलीस ठाण्यात यश सोनवणेविरुद्ध लैंगिक अत्याचाराची फिर्याद दिली आहे. 

पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक न्याहाळदे करीत आहेत. हा प्रकार दि. 16 ऑक्टोबर 2023 ते दि. 13 जानेवारी 2025 दरम्यान श्रमिकनगर येथे घडला.
इतर बातम्या
Join Whatsapp Group