EPFO च्या नियमात मोठा बदल! नाव ते DOB...आता 'या' गोष्टी कागदपत्रांशिवाय करता येणार अपडेट
EPFO च्या नियमात मोठा बदल! नाव ते DOB...आता 'या' गोष्टी कागदपत्रांशिवाय करता येणार अपडेट
img
Dipali Ghadwaje
प्रत्येक कर्मचाऱ्याचे पीएफ अकाउंट , पेन्शन अकाउंट रेग्युलेट करण्याचे काम ईपीएफओ करते. कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या नियमांमध्ये बदल झाले आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधीत आता अकाउंट अपडेट करणे सोपे झाले आहे. 

यासाठी काही नियमांमध्ये बदल करण्यात आले आहे. आता तुम्हाला EPFO प्रोफाइल अपडेट करण्यासाठी कोणत्याही कागदपत्रांची गरज भासणार नाही. EPFO च्या या निर्णयामुळे ३.९ लाख सदस्यांना लाभ मिळणार आहे.

ईपीएफओ सिस्टीम अपडेट झाले आहे. आता या नवीन अपडेटमध्ये कोणताही सदस्य कोणत्याही कागदपत्रांशिवाय सोप्या पद्धतीने आपली वैयक्तिक माहिती बदलता येणार आहे.

ईपीएफओ सिस्टीममध्ये तुम्ही नाव, जन्मतारीख, लिंग, राष्ट्रीयता, आई-वडिलांचे नाव, लग्नाचा दाखला, नवऱ्याचे नाव ही माहिती एडिट करु शकतात. कोणत्याही कागदपत्राशिवाय तुम्हाला हे काम करता येणार आहे. 

ईपीएफओने याबाबत माहिती दिली आहे. ज्या सदस्यांचे युनिव्हर्सल अकाउंट नंबर आधार कार्डसोबत वेरिफाय केले आहे. त्यांना कोणत्याही कागदपत्राशिवाय माहिती बदलता येणार आहे. तक्रारी कमी करणे हा यामागचा उद्देश आहे. सध्या जर काही बदल असतील तर त्यासाठी २८ दिवसांचा कालावधी लागतो.

आता ४५ टक्के रिक्वेस्ट सदस्यांद्वारे अप्रूव करण्यात येणार आहे. तर ५० टक्के लोकांचे काम फक्त नियोक्त्याच्या परवानगीने होणार आहे. यासाठी आधार कार्ड आणि पॅन कार्ड ईपीएफ खात्याशी लिंक असणे गरजेचे आहे. तुम्हाला कोणतीही रक्कम विड्रॉल करायची असेल तर हे अपडेट असणे गरजेचे आहे.

सध्या ईपीएफओ सदस्यांच्या ज्या तक्रारी आहेत त्या प्रोफाईल आणि केवायसीशी संबंधित आहेत. या बदलामुळे आता कमी तक्रारी येतील. याचसोबत प्रोफाइलमध्ये बदल करण्यासाठी कोणतेही कागदपत्र जमा करण्याची गरज नाही. त्याचसोबत नियोक्त्याच्या मंजुरीची गरज नाही. यासाठी आधार कार्ड तुमच्या यूएएन नंबरशी लिंक असणे गरजेचे आहे.

ईपीएफओ प्रोफाइल अपडेट कसं करायचं? 

(https://unifiedportal-mem.epfindia.gov.in/memberinterface/) या वेबसाइटवर जायचे आहे. त्यानंतर यूएएन नंबर, पासवर्ड टाकून लॉग इन करायचे आहे. यानंतर मॅनेज टॅबवर क्लिक करायचे आहे.

यानंतर तुम्हाला जे काही अपडेट करायचे आहे त्यावर क्लिक करुन मोडिफाय बेसिक डिटेल्सवर क्लिक करायचे आहे.

यानंतर आवश्यक माहिती भरायची आहे. ईपीएफ आणि आधारमधील माहिती सेम असणे गरजेचे आहे. त्यानंतर आधार कार्ड, पॅन कार्ड, जन्मदाखला अपलोड करायचा आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group