यंदाचा 'व्हॅलेंटाईन वीक' खास! प्रेमाचा आठवडा कधीपासून सुरू होतोय? जाणून घ्या ‘रोज डे’ ते ‘व्हॅलेंटाईन डे’पर्यंतची पूर्ण यादी
यंदाचा 'व्हॅलेंटाईन वीक' खास! प्रेमाचा आठवडा कधीपासून सुरू होतोय? जाणून घ्या ‘रोज डे’ ते ‘व्हॅलेंटाईन डे’पर्यंतची पूर्ण यादी
img
Dipali Ghadwaje
फेब्रुवारी हा प्रेमाचा महिना म्हणून ओळखला जातो. प्रेमीयुगुलांसाठी ह्या महिन्यात काही खास दिवस असतात. आजकाल तरूण- तरूणी पासून मोठ्यापर्यंत सर्वांमध्येच व्हॅलेंनटाईन आठवडा साजरा करण्याचा नवा ट्रेंड सुरू झाला आहे. 

फेब्रुवारी महिना सुरू होताच वेध लागतात ते व्हॅलेंटाईन वीकचे. प्रेम करणाऱ्या प्रत्येकासाठी हा महिना खूप खास असतो. कारण यानिमित्ताने प्रिय व्यक्तीसमोर आपल्या मनातील प्रेमाची भावना व्यक्त करता येते. तसेच आधीच जोडीदार असेल तर त्याला व्हॅलेंटाईन डेनिमित्ताने चांगले गिफ्ट्स देता येते, फिरायला घेऊन जाता येते. आपल्या प्रेमाच्या नात्यातील आनंद साजरा करता येतो.

व्हॅलेंटाईन वीक दरवर्षी ७ फेब्रुवारीपासून सुरू होतो आणि १४ फेब्रुवारीपर्यंत साजरा केला जातो. या व्हॅलेंटाईन वीकचा प्रत्येक दिवस हा खास असतो. यंदा तुम्हालाही तुमच्या प्रिय व्यक्तीसमोर मनातील भावना व्यक्त करायच्या असतील तर रोज डेपासून किस डेपर्यंत संपूर्ण दिवसांची यादी जाणून घ्या.

१) रोज डे (७ फेब्रुवारी २०२५)  
व्हॅलेंटाईन वीकचा पहिला दिवस रोज डे म्हणून साजरा केला जातो. यानिमित्त प्रेमीयुगल एकमेकांना गुलाबाचे फूल देऊन आपल्या प्रेम भावना व्यक्त करतात. या दिवसापासून व्हॅलेंटाईन वीकची सुरुवात होते. रंगीबेरंगी गुलाबाची फुलं वेगवेगळ्या भावनांचे प्रतिनिधित्व करतात.

२) प्रपोज डे (८ फेब्रुवारी २०२५)  
व्हॅलेंटाईन वीकच्या दुसऱ्या दिवशी प्रपोज डे साजरा केला जातो. प्रपोज डे तुम्हाला तुमच्या क्रश किंवा पार्टनरला तुमचे प्रेम प्रपोज करण्याची संधी देतो. या दिवशी लोक आपल्या प्रेयसीला लग्नासाठी किंवा नात्यासाठी प्रपोज करतात.

३) चॉकलेट डे (९ फेब्रुवारी २०२५)  
चॉकलेट डे म्हणजे प्रेमात गोडवा वाढवण्याचा दिवस. प्रपोज डेनंतर तिसरा दिवस चॉकलेट डे म्हणून साजरा केला जातो. या दिवशी प्रेमीयुगल एकमेकांना आनंदाने चॉकलेट बुफे, चॉकलेट बास्केट भेट देतात.

४) टेडी डे (१० फेब्रुवारी २०२५)  
टेडी डे हा व्हॅलेंटाईन वीकचा चौथा दिवस आहे. यावेळी लोक आपल्या जोडीदाराला प्रेमाचं प्रतीक म्हणून आवडत्या रंगाचा टेडी बेअर गिफ्ट देऊन आपल्या भावना व्यक्त करतात.

५) प्रॉमिस डे (११ फेब्रुवारी २०२५)  
व्हॅलेंटाईन वीकचा पाचवा दिवस प्रॉमिस डे म्हणून साजरा करतात. या दिवशी प्रेमी युगल एकमेकांना आनंदाने एकत्र राहण्याचे वचन देतात.

६) हग डे (१२ फेब्रुवारी २०२५)  
व्हॅलेंटाईन वीकच्या सहाव्या दिवशी प्रेमी युगल एकमेकांना मिठी मारून प्रेम आणि आपुलकी व्यक्त करतात.

७) किस डे (१३ फेब्रुवारी २०२५)  
व्हॅलेंटाईन वीकचा सातवा दिवस किस डे म्हणून साजरा केला जाणार आहे, जो यंदा १३ फेब्रुवारीला आहे.

८) व्हॅलेंटाईन डे (१४ फेब्रुवारी २०२५)  
व्हॅलेंटाईन डे हा व्हॅलेंटाईन वीकचा शेवटचा दिवस आहे. या दिवशी प्रेमी युगल डेट, डिनर प्लॅन करतात. हा दिवस संस्मरणीय बनवण्यासाठी ते यापेक्षाही काही खास आणि वेगवेगळे प्लॅन करताना दिसतात.
इतर बातम्या
Join Whatsapp Group