शिकला एक विषय अन् आला दुसरा विषय ; बारावी परीक्षेच्या हॉल तिकिटावर बोर्डाचा गोंधळ, नेमकं काय प्रकरण?
शिकला एक विषय अन् आला दुसरा विषय ; बारावी परीक्षेच्या हॉल तिकिटावर बोर्डाचा गोंधळ, नेमकं काय प्रकरण?
img
Dipali Ghadwaje
महाराष्ट्र बोर्डाची बारावीची परीक्षा ११ फेब्रुवारीपासून सुरु होत आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना हॉल तिकीट मिळाले आहेत. परंतु परीक्षेच्या हॉल तिकिटावर विद्यार्थ्यांनी घेतलेल्या विषयांपेक्षा वेगळे विषय आल्याने पालकांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार , कोल्हापुरातील पालक विमला गोयंका महाविद्यालयात पोहचले आहेत. पालकांनी यासंदर्भात प्रशासनाला जाब विचारला आहे.  दरम्यान  एकाच वेळी महाविद्यालयात मोठ्या संख्येने पालक जमा झाल्याने गोंधळ उडाला आहे.

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परीक्षा ११ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. यंदा राज्यात परीक्षार्थींची संख्या गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी ३५ हजारांनी वाढली आहे. बारावीच्या परीक्षार्थींच्या संख्येत १७ हजारांनी वाढ झाली आहे. अशातच विद्यार्थ्यांना परीक्षेचे हॉल तिकीट मिळाले आहे. परंतु आता या हॉल तिकिटांवरील गोंधळ समोर आला आहे. 

विद्यार्थ्यांनी घेतलेला विषय हॉल तिकिटावर आला नाही. त्याऐवजी दुसराच विषय हॉल तिकिटावर आलेला आहे. यामुळे विद्यार्थ्यांचा गोंधळ होत आहे. यासंदर्भात कोल्हापूरमधील पालक महाविद्यालयात पोहचले असून प्रशासनाला जाब विचारत आहे.

विद्यार्थी बारावीत जो विषय शिकले. ज्या विषयाचा अभ्यास केला, तो विषय हॉल तिकिटावर दिलेला नाही. वर्षभर दुसऱ्या विषयाचा अभ्यास करून हॉल तिकिटावर वेगळेच विषय आल्याने विद्यार्थी धास्तावले आहेत. आता परीक्षेच्या तोंडावर हॉल तिकिटांवर झालेल्या चुका दुरुस्त करण्यासाठी पालक अन् विद्यार्थ्यांचा मात्र गोंधळ उडणार आहे.
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group