Nashik : पांडवलेणी येथील जंगलाला भीषण  आग
Nashik : पांडवलेणी येथील जंगलाला भीषण आग
img
चंद्रशेखर गोसावी


नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- शहराजवळील पांडवलेणी परिसरात असलेल्या जंगलाला  शुक्रवारी दुपारच्या सुमारास आग लागली. हे वृत्त समजताच आग विझविण्यासाठी वनविभाग व इतर यंत्रणा परिश्रम घेत आहे; मात्र जंगलामुळे आग वाढत असून, त्यामुळे वनप्रेमी नागरिकांमध्ये आणि पर्यटकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे.

नाशिक-मुंबई महामार्गावरील विल्होळी गावाजवळ असलेल्या पांडवलेणी परिसरात घनदाट जंगल आहे. अतिशय जुने असे हे जंगल असून या ठिकाणी असलेल्या जंगलात विविध प्रकारच्या औषधी वनस्पतींबरोबरच मोर, लांडोर, रानडुकरे व बिबटे यासारखे प्राणी वास्तव्यास आहेत. या ठिकाणची नैसर्गिक वनसंपदा मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे या जंगलाचे नाशिक शहरातील नागरिकांबरोबरच येणार्‍या पर्यटकांनादेखील मोठे आकर्षण आहे.

पांडवलेणी परिसरात असलेल्या या जंगलाला शुक्रवारी दुपारी अचानक आग लागली. ही आग लागल्याचे लक्षात येण्यापूर्वीच आग मोठ्या प्रमाणावर भडकली. वनविभाग व इतर अधिकार्‍यांना माहिती मिळताच त्या यंत्रणा उपस्थित झाल्या; मात्र सध्या झाडांच्या पानगळीचा हंगाम असून, जंगलामुळे मोठ्या प्रमाणात पानगळ झालेल्या झाडांचा पाला असल्यामुळे आग भडकत आहे. त्यामुळे आगीवर नियंत्रण मिळविणे अवघड असून, मनपा व वन खात्याच्या प्रशासनाच्या वतीने आग विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

इतर बातम्या
Join Whatsapp Group