लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कारानं पंतप्रधान नरेंद्र मोदींचा गौरव...!
लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कारानं पंतप्रधान नरेंद्र मोदींचा गौरव...!
img
Dipali Ghadwaje

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे दौऱ्यावर आहेत.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार २०२३ नं आज पुण्यात सन्मानित करण्यात आलं. दिपक टिळक यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. लोकमान्य टिळक स्मारक ट्र्स्टच्यावतीनं लोकमान्य टिळकांच्या पुण्यतिथीनिमित्त हा पुरस्कार दिला जातो.

लोकमान्य टिळकांची ओळख असलेली पुणेरी पगडी, शाल, सन्मानपत्र, सन्मान चिन्ह आणि दैनिक केसरीचा पहिला अंक आणि प्रतिमा आणि १ लाख रुपये रोख असं या पुरस्काराचं स्वरुप आहे. यातील १ लाखांची रक्कम पंतप्रधान मोदींच्या सूचनेनुसार 'नमामी गंगे' या गंगा नदी स्वच्छतेच्या प्रकल्पासाठी देण्यात येण्यात आली.

यावेळी या कार्यक्रमात बोलताना मोदींनी लोकमान्य टिळकांविषयीच्या कार्यांची जनतेला आठवण करुन दिली. तसेच उपस्थितांना संबोधित करताना त्यांनी मराठी भाषेतून आपल्या भाषणाला सुरुवात केली. उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधान मोदींनी लाल बाल आणि पाल या तिन्ही नावांची आणि इंग्राजांच्या काळाची आठवण करुन दिली.

" स्वातंत्र्याच्या काळात इंग्रजांनी टिळकांवर फार अन्याय केला. त्यावेळी स्वातंत्र्यासाठी टिळकांनी त्याग आणि बलिदानाची पाराकाष्टा केली. यावेळी त्यांच्यासोबत लाला लजपतराय आणि बिपिन चंद्र पाल यांच्यातील विश्वास भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील सुवर्ण अध्याय आहे. आजही लाल बाल आणि पाल ही तिन्ही नावे त्री शक्तीच्या रुपाने आठवली जातात",असं यावेळी मोदी म्हणाले.

इंग्रजांना टिळकांना भारतीय अशांततेचे जनक म्हणावे लागले होते. आजही लोकमान्य टीळकांचे केसरी काही घरांमध्ये वाचले जाते. शिवजयंतीचे आयोजन भारतातील संस्कृतिला गुंफण्याचे आव्हान होते. टिळकांनी यातून सामाजाला नवीन दिशा दाखवली. आजच्या तरुणाईसाठी ही मोठी शिकवण आहे, असं मोदींनी यावेळी म्हटलं.

दरम्यान कोरोना काळात अनेक नागरिक दगावले. यावेळी महामारी रोखण्यासाठी आपण भारतीय लस बनवली. त्यात भारताचा महत्वाचा वाटा आहे. आत्मनिर्भर भारताच्या दिशेने हे आपलं पाऊल आहे. पूर्वी लहान सहान कामांसाठी लोकांना त्रास व्हायचा. आता वेगाने कामे होतात, त्यामुळे विश्वास वाढतोय. जग भारताकडे भविष्य म्हणून पाहत आहे. लोकमान्य टिळक आपल्याला पाहून आशिर्वाद देत असतील, असं मत यावेळी मोदींनी व्यक्त केलं.

यावेळी सर परशुराम भाऊ महाविद्यालयाच्या मैदानावर हा सोहळा पार पडला. यावेळी व्यासपीठावर राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे, ट्रस्टचे अध्यक्ष दिपक टिळक आदी उपस्थित होते.

इतर बातम्या
Join Whatsapp Group