केंद्रीय मंत्रिमंडळाने केंद्र सरकारच्या महागाई भत्त्यात दोन टक्क्यांची वाढ केली आहे. या नव्या सुधारणेमुळे आता महागाई भत्ता ५३ टक्क्यांवरून ५५ टक्क्यांवर पोहोचणार आहे. ज्यामुळे कर्मचाऱ्याच्या पगारातही वाढ होईल.
जुलै २०२४ मध्ये शेवटची वाढ करण्यात आली होती. तेव्हा महागाई भत्ता ५० टक्क्यांवरून ५३ टक्क्यांवर पोहोचला होता. वाढत्या महागाईचा सामना करण्यासाठी केंद्रातील सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता (डीए) दिला जातो.
राहणीमानाचा खर्च वाढू लागल्यानंतर वेतनाचे मूल्य कमी होऊ नये, यासाठी हा भत्ता दिला जातो. दर दहा वर्षांनी कर्मचाऱ्यांच्या मूळ पगारात वेतन आयोगाकडून वाढ करण्यात येत असते. पण डीए मात्र वेळोवेळी वाढविला जातो.
महागाई भत्त्याचा लाभ कुणाला?
केंद्र सरकारचे कर्मचारी
पेन्शनधारक
पेन्शनधारकानंतर अवलंबून असलेली व्यक्ती