मोठी बातमी! रेडी रेकनर दरात वाढ ; कोणत्या जिल्ह्यात रिअल इस्टेटचे भाव उसळी घेणार? वाचा
मोठी बातमी! रेडी रेकनर दरात वाढ ; कोणत्या जिल्ह्यात रिअल इस्टेटचे भाव उसळी घेणार? वाचा
img
Dipali Ghadwaje
आर्थिक वर्ष संपताच राज्य सरकारने रेडी रेकनर दरात मोठी वाढ केली असून याचा फटका मालमत्ता खरेदी करणाऱ्यांना बसणार आहे. महानगरपालिका क्षेत्रात 5.95% (मुंबई वगळता) एवढी वाढ करण्यात आली आहे. तर ग्रामीण भागात 3.36% वाढ करण्यात आली आहे. 

प्रभाव क्षेत्रात 3.29%, नगरपरिषद / नगर पंचायत क्षेत्र 4.97%, बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्र सरासरी वाढ 3.39% अशी वाढ करण्यात आली आहे. ही वाढ पाहता राज्यात सरासरी 4.39% (मुंबई वगळता) व राज्याची एकूण रेडीरेकनर दरातील वाढ ही 3.89% करण्यात आली आहे.

सन 2017-18 साली वार्षिक रेडी रेकनर रेट तयार करण्यात आले होते. त्यानंतर सलग 2 वर्षे स्थावर मिळकत क्षेत्रातील मंदीचा विचार करुन (सन 2018-19 व 2019-20) साठी सदर दर कायम ठेवण्यात आले होते. यानंतर कोरोना संकटामुळे विचार करून हे दर कमी प्रमाणात वाढविण्यात आले होते. ते पुढे 2022-23 मध्ये वाढविण्यात आले. तसेच हेच दर पुढील दोन वर्षे म्हणजे 2024-25 करिता कायम ठेवण्यात आले होते. 

शहरांचा, जिल्ह्याचा तक्ता खालीलप्रमाणे...


 पुणे - 4.16

पिंपरी चिंचवड - 6.69

ठाणे- 7.72

मीरा भाईंदर -6.26

कल्याण - डोंबिवली - 5.84

नवी मुंबई -6.75

उल्हासनगर - 9

वसई - विरार - 4.50

पनवेल - 4.97

सांगली - मीरज - कुपवाड  - 5.70

कोल्हापुर - 5.1

इचलकरंजी - 4.46

सोलापुर -10.17

नाशिक - 7.31

संभाजी नगर - 3.53

नागपुर -4.23

अहिल्यानगर - 4.41

धुळे - 5.7

मालेगाव -4.88

नागपूर एन एम आर डी ए - 6.60

अमरावती - 8.3

अकोला - 7.39

लातुर -4.1

परभणी - 3.71

अशी आहे एकूण दरवाढ :

राज्याची सरासरी वाढ - 4.39 टक्के (मुंबई वगळता)

महापालिका क्षेत्र - 5.95 टक्के (मंबई वगळता)

मुंबई महापालिका क्षेत्र सरासरी वाढ - 3.39 टक्के

संपूर्ण राज्याची एकूण वाढ -3.89 टक्के

ग्रामीण क्षेत्र - 3.36 टक्के

प्रभाव क्षेत्र - 3.29 टक्के

नगरपरिषद/पंचायत क्षेत्र - 4.97 टक्के

इतर बातम्या
Join Whatsapp Group