नाशिक - ६ तारखेला रामनवमी आणि मंगळवारी 8 तारखेला रथयात्रा असल्यामुळे वाहतुकीमध्ये बदल करण्यात आला आहे. याची अधिसूचना पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांनी प्रसिद्ध केली आहे .
परंपरा असलेल्या नाशिकच्या काळाराम मंदिरामध्ये येथे ६ तारखेला रामनवमी उत्सव साजरा केला जाणार आहे. निमित्ताने होणारी गर्दी लक्षात घेता वाहतुकीमध्ये बदल करण्याचा निर्णय पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी घेतला आहे. या अधिसूचनेमध्ये म्हटले आहे की, श्री काळाराम मंदिर, पंचवटी परिसरात श्रीरामाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठया प्रमाणात गर्दी होत असते, तसेच सरदार चौक ते श्रीकाळाराम मंदिर पुर्व दरवाजा हा रस्ता अरुंद असल्याने या मार्गावर वाहनांची रहदारी सुरू ठेवल्यास वाहतुक कोंडी निर्माण होवु शकते.
अपघात होवुन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवु नये म्हणुन तसेच नागरिकांच्या सोयीसाठी श्री काळाराम मंदिर पंचवटी नाशिक परिसरातील सरदार चौक ते श्रीकाळाराम मंदिर पुर्व दरवाजा पर्यंतचा मार्ग दोन्ही बाजुने येण्या-जाण्यासाठी, लक्ष्मण झुला ते काळाराम मंदीर पुर्व दरवाजा पर्यंतचा मार्ग दोन्ही बाजुने येण्या-जाण्यासाठी, शनी चौक ते श्रीकाळाराम मंदिर पुर्व दरवाजा पर्यंतचा मार्ग दोन्ही बाजुने येण्या-जाण्यासाठी, शिवाजी चौक (सप्तश्रृंगी देवी मंदीर) सितागुंफाकडे जाणारा रोड पर्यंतचा मार्ग दोन्ही बाजुने येण्या-जाण्यासाठी सर्व प्रकारच्या वाहनांना वाहतुकीसाठी प्रवेश बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा असे आवाहन करण्यात आलेले आहे.
येत्या ८ एप्रिल रोजी रथयात्रा असल्यामुळे शहरातील वाहतुकीची कोंडी थांबविण्यासाठी वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. श्रीराम रथ मिरवणूक श्री काळाराम मंदिर पूर्व दरवाज्यापासुन नागचौक- चरण पादुका चौक- लक्ष्मण झुला पुल-काटया मारूती-गणेशवाडी-महात्मा फुले पुतळा-आयुर्वेदिक हॉस्पिटल-मरीमाता रोडने गौरी पटांगण-म्हसोबा पटांगण-कपालेश्वर मंदिर रामकुंड परशुराम पुरीया रोडने मालवीय चौक -शनि चौक हनुमान चौक-आखाडा तालीम काळाराम मंदिर उत्तर दरवाजा ते काळाराम मंदिर पुर्व दरवाजा या मार्गावरून मिरवणूक काढण्यात येणार आहे.
तसेच 'श्री गरुडरथ' मिरवणूक श्रीरामस्था सोबत निघत असतो. त्याचा मार्ग काळाराम मंदिर- नागचौक- चरण पादुका रोडने-लक्ष्मण झुला पुल- जुना आडगांव नाका-काटयामारूती पोलीस चौकी - गणेशवाडी- महात्मा फुले पुतळा -आयुर्वेदिक हॉस्पिटल -मरीमाता रोडने गौरी पटांगण -रोकडोबा- हनुमान मंदिर -गाडगे महाराज पुलाखालून दिल्ली दरवाजा नेहरू चौक-धुमाळ पॉईंट-मेनरोडने बोहोरपट्टी-सराफ बाजार-रामसेतू पुलाच्या पश्चिम बाजुने कपूरथला मैदान-म्हसोबा पटांगण-रामरथा बरोबर येवुन काळाराम मंदिर पूर्व दरवाजा या मार्गावरून मिरवणूक काढण्यात येणार असल्याने श्री रामस्थ व श्री गरुड स्थ या मिरवणूक मार्गावर वाहतूकीची कोंडी होवू नये म्हणून या मार्गावर देखील रथयात्रा संपेपर्यंत बंदी घालण्यात आलेली असून नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करून सहकार्य करण्याचे आवाहन देखील त्यांनी केले आहे.
असे आहेत पर्यायी मार्ग
काट्यामारुती चौकाकडून गणेशवाडी मार्गे मेनरोड कडे जाणारी वाहने काट्या मारुती - पंचवटी कारंजा- मालेगाव स्टॅन्ड - रविवार कारंजा कडून इतरत्र जातील व येतील. किंवा काट्या मारुती - संतोष टी पॉईंट - द्वारका सर्कल - सारडा सर्कल मार्गे इत्ररत्र जातील व येतील.