कर्नाटक फिल्म चेंबर्स ऑफ कॉमर्स यांनी गायक सोनू निगमला पूर्णपणे बहिष्कृत करण्याचा निर्णय घेतला आहे. एका संगीत कार्यक्रमामध्ये त्याने केलेल्या पहलगाम हल्ल्यावरील वक्तव्यावरून ही कारवाई करण्यात आली आहे. तसेच त्यांनी सोनू निगमने त्याच्या या वादग्रस्त व्यक्तव्यासाठी कन्नड भाषिकांची जाहीर माफी मागावी. अशी मागणी देखील केली आहे.
काय म्हणाला होता सोनू निगम?
कर्नाटकमधील अवलाहल्ली येथील ईस्ट पॉईंट कॉलेज ऑफ इंजीनियरिंगमध्ये सोनू निगमच्या संगीताचा कार्यक्रम पार पडला. या गाण्याच्या कार्यक्रमाच्या वेळी सोनू निगमला जेव्हा चहात्यांनी कन्नड गाणं गाण्याची विनंती केली. त्यावेळी त्याने कन्नड चाहत्यांच्या या विनंतीची तुलना पहेलगाम दहशतवादी हल्ल्याशी केली त्यावरून सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. त्यामुळे सोनूी निगमवर बहिष्कार टाकण्याच निर्णय कर्नाटक फिल्म चेंबरकडून घेण्यात आला आहे.