'इंद्रायणी'ने घेतला मोकळा श्वास ; पालिकेने
'इंद्रायणी'ने घेतला मोकळा श्वास ; पालिकेने "त्या" ३६ बंगल्यांवर बुलडोझर चालवला
img
Dipali Ghadwaje
पिंपरी- चिंचवड शहरातील इंद्रायणी नदी पात्रातील अनधिकृत बंगल्यांविरोधात महापालिकेने मोठी कारवी केली. निळ्या पूर रेषेत उभारण्यात आलेल्या ३६ अनधिकृत बंगल्यांवर पालिकेने बुलडोझर चालवला. आज सकाळपासून पिंपरी- चिंचवड महापालिका मोठी विश्लेषणाची कारवाई करत आहे. हे सर्व बंगले जमिनदोस्त करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे आता इंद्रायणी नदीपात्र मोकळे झाले.


सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतर पिंपरी चिंचवड महापालिका आज चिखली येथील इंद्रायणी नदी पात्रात उभारण्यात आलेल्या जवळपास ३६ बंगल्यांवर बुलडोझर चालवत आहे.  या कारवाईमुळे या बंगल्यांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना मोठा धक्का बसला आहे.

चिखली येथील इंद्रायणी नदीपात्रात झरे वर्ल्ड बिल्डरकडून निळ्या पूर रेषेत अनधिकृत ओपन प्लॉटिंग करण्यात आली होती. या ओपन प्लॉटिंगवर जवळपास ३६ जागा मालकांनी कोट्यावधी रुपये खर्च करून आलिशान बंगले बांधले होते.

हे बंगले नदीपात्रातील निळ्या पूर रेषेत अनधिकृत पणे उभारण्यात आल्याने या प्रकरणात तक्रारदार आणि बंगले मालक हे राष्ट्रीय हरित लवाद आणि सर्वोच्च न्यायालयात गेले होते. या खटलाच्या अंतिम सर्वोच्च न्यायालयाने ३१ मे २०२५ पर्यंत सर्व अनधिकृत बंगले पाडून नदीपात्रातील भराव आणि राडारोडा पूर्णपणे उचलण्याचे आदेश पिंपरी चिंचवड महापालिकेला दिले होते.

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर आज पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेने या अनधिकृत बंगल्यांवर कारवाई सुरू केली. आज बंगल्यांवर बुलडोझर चालवण्याची मोठी कारवाई करण्यात येत आहे.  या तोडकाम कारवाईमध्ये पालिकेचे कर्मचारी मोठ्यासंख्येत सहभागी झाले आहेत.
इतर बातम्या
Join Whatsapp Group