मद्यपान करून पुजाऱ्याचा धिंगाणा, तुळजाभवानी मंदिरात तोडफोड प्रकरण ; प्रशासनाने असा शिकवला धडा
मद्यपान करून पुजाऱ्याचा धिंगाणा, तुळजाभवानी मंदिरात तोडफोड प्रकरण ; प्रशासनाने असा शिकवला धडा
img
नंदिनी मोरे
सुप्रसिद्ध अशा तुळजाभवानी मंदिरात एका पुजाऱ्याने गैरवर्तन केले होते. या पुजाऱ्याने चक्क मद्यपान करून मंदिरात धिंगाणा घातल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली  होती या प्रकरणात आता एक माहिती समोर आली आहे. दारू पाऊण  पुजाऱ्याने कार्यालयाची तोडफोड केली. त्याने दगड मारून दरवाजेही फोडले. मंदिर संस्थान प्रशासनाकडून देऊळ कवायत कायद्यानुसार कारणे दाखवा नोटिस दिल्याने पुजाऱ्याने दारू पिऊन धिंगाणा केला.


अनुप कदम असे गोंधळ घालणाऱ्या पुजाऱ्याचे नाव आहे. त्याच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मंदिर संस्थानाने गैरवर्तनामुळे नोटीस दिल्याचा राग मनात धरून अनुप कदम यांने मद्यपान करत तहसीलदार तथा व्यवस्थापक यांच्या नावे शिवीगाळ आणि धक्काबुक्की करत काचेची तोडफोड केली होती.
तुळजाभवानी मंदिर संस्थान कार्यालयात तोडफोड करणारा पुजारी अनुप कदमवर मंदिर संस्थानाकडून 3 वर्ष मंदिर प्रवेशबंदीची कडक कारवाई करण्यात आली आहे. या अगोदर या प्रकरणी तुळजापूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पुजारी व्यवसायास न शोभणारे वर्तन असल्याचे स्पष्ट करीत सदर प्रकरणी जबाबदार धरून देऊळ कवायत कायदा कलम 24 व 25 अन्वये पुढील 3 वर्षांकरिता मंदिर प्रवेशबंदीचा आदेश पारित करण्यात आला आहे.

या प्रकरणाची चौकशी सुरू असताना मंदिर बंदी का करण्यात येऊ नये, अशी नोटीस दिल्याने त्याने गोंधळ घातला. घटनेनंतर मंदिर संस्थानकडून तुळजापूर पोलिस स्टेशन येथे भारतीय न्याय संहिता, 2023 च्या कलम 221, 352, 324(4) नुसार गुन्हा करण्यात आला असून आरोपी फरार झाला आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group