“गोदावरीच्या किनाऱ्यावर जडीबुटी विक्रेते तसेच वेगवेगळ्या प्रकारचे साहित्य विकणाऱ्या विक्रेत्यांनी पाल मांडून आपली दुकाने थाटली होती. त्यामुळे वाहतुकीस तसेच येणाऱ्या भाविकांना अडचणीला तोंड द्यावे लागत होते.

गेल्या दोन दिवसापूर्वी मनपा आयुक्त रमेश पवार यांनी रामघाट-गोदावरी नदी भागात प्रत्यक्ष पाहणी केली होती. या पाहणीत आयुक्तांना पंचवटीत रामकुंड, रामघाट-गोदावरी नदी परिसरात सर्व चहूबाजूंनी विविध व्यवसाय धारकांकडून मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केलेले असल्याचे दिसून आले. ही बाब गंभीरअसून गोदावरी नदीचे मोठे नुकसान असून पर्यटकांना, नागरिकांना पायी चालणे कठीण बनले आहे.
भर रस्त्यावरील अतिक्रमण दररोज होऊ नये.त्यानुसार आयुक्त यांच्या आदेशानुसार बुधवारी (दि.२०) रोजी उपायुक्त करूणा डहाळे यांनी तातडीने पंचवटी, पूर्व व पश्चिम विभागीय अधिकारी आणि अतिक्रमण विभाग यांच्या संयुक्तपणे पाहणी करून ध्वनी प्रक्षेपणद्वारे पंचवटी-रामकुंड ते संत गाडगेबाबा पुल व संपूर्ण गोदावरी नदीच्या भागात अतिक्रमण करणाऱ्या व्यवसाय धारकांना आवश्यक सुचना देण्यात आल्या होत्या.
आज (दि.२१) रोजी पूर्व व पश्चिम आणि पंचवटी विभागीय कार्यालयाकडून पंचवटी-गोदावरी नदी, रामघाट भागात अतिक्रमण मोहीम राबविण्यात आली.यावेळी अतिरिक्त आयुक्त श्रीमती करूणा डहाळे, उपायुक्त दिलीप मेनकर, गोदावरी संवर्धन कक्षाचे उपायुक्त विजयकुमार मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली पंचवटी विभागीय अधिकारी कैलास राभडिया,पश्चिम विभागीय अधिकारी श्री.हरिश्चंद्र, पूर्व विभागीय अधिकारी नवनित निकम, अधिक्षक श्री.धामणे, सहा.अधिक्षक भुषण देशमुख, राजेश सोनवणे, दिपक मिंदे, प्रकाश उखाडे, अतिक्रमण विभागाचे प्रविण बागुल, श्रीअभंग, सहायक पोलीस निरीक्षक दिनेश खैरनार आदींसह मनपा अतिक्रमण विभागाचे सर्व कर्मचारी आणि पोलीस पथक उपस्थित होते. या अतिक्रमण मोहिमेत गंगा नदीच्या दोन्ही काठावरील असलेले मोठ्या प्रमाणातील अतिक्रमण हटविण्यात आले.
यापुढे गंगा नदीच्या काठावर व्यवसाय धारकांनी अतिक्रमण करू नये व मनपाला सहकार्य करण्याचे सुचना देण्यात आल्या. यापुढे पंचवटी पंचवटीत रामकुंड रामघाट-गोदावरी नदीच्या काठावरील केलेले अतिक्रमण हटविण्यात येतांना सदर ठिकाणी व्यवसाय करण्यासाठी बंदी घालण्यात येणार आहे. व मनपाचे आणि गोदावरी नदीचे कुठल्याही प्रकारे नुकसान होणार नाही.याबाबत मनपासह अधिकृत व्यवसाय धारकांकडून काळजी घेतली जाणार आहे.अशी माहिती उपायुक्त श्रीमती. करूणा डहाळे यांनी दिली. *(सोबत फोटो..)*