नाशिक (प्रतिनिधी) :– नाशिकरोड विभागात मुक्तीधाम जलकुंभावरुन येणारी मुख्य वितरण वाहिनीला मोठया प्रमाणात गळती सुरु झाल्याने या वाहिनीच्या दुरूस्तीचे तातडीने काम हाती घेण्यात आले आहे. यामुळे तात्काळ या वाहिनीच्या दुरुस्तीचे काम सुरु केले आहे.

परंतु कामाचे स्वरुप मोठे असल्याने कामास विलंब होणार आहे. त्यामुळे नाशिकरोड विभागातील प्रभाग क्रमांक 19 मधील सिन्नर फाटा परिसरात, स्टेशन परिसरात तसेच प्रभाग क्रमांक 22 मधील खर्जुल मळा, गाडेकर मळा परिसरात शुक्रवारचा (दि. 1 एप्रिल) सकाळ सत्राचा पाणीपुरवठा होणार नाही.

तसेच दुपार सत्र व सांयकाळचा पाणीपुरवठाही कमी दाबाने होईल. तरी नागरिकांनी याची नोंद घ्यावी व मनपास सहकार्य करावे, असे आवाहन मनपाकडून करण्यात आले आहे.