नाशिक :- सातपुर पाणीपुरवठा विभागातील 500 मी.मी. व्यासाची पी.एस.सी. सिमेंट पाईपलाईन ध्रुवनगर, बळवंत नगर, गणेश नगर, रामराज्य, नहुष जलकुंभ, भरणारी पिण्याची थेट पाईप लाईनला खालील ठिकाणी गळती सुरु झालेली असल्याने पाणी वाया जात आहे.

1) कार्बन नाका, मेघा इंडस्ट्रीज लगत 500 मी.मी. व्यासाची पी.एस.सी. सिमेंट पाईपलाईन.
2) मोतीवाला कॉलेज, महाराष्ट्र मार्बल, ध्रुव नगर डि.पी. रोड लगत 500 मी.मी. व्यासाची सिमेंट पाईपलाईन.
वरील ठिकाणी दि. 7 एप्रिल रोजी पाईप गळती दुरुस्तीचे कामे सकाळी 9 वाजता हाती घ्यावयाचे असल्याने सातपुर विभागातील खालील प्रभागातील पाणी पुरवठा गुरुवार दि. 7 एप्रिल रोजी सांयकाळचा पाणी पुरवठा होणार नाही व दि. 8 एप्रिल रोजीचा सकाळचा पाणी पुरवठा कमी दाबाने होईल.

सातपूर विभाग व पश्चिम प्रभाग
प्रभाग क्र.7 (भागश:):- नहुष जलकुंभ वितरण क्षेत्रातील परिसर :- नहुष सोसायटी परिसर, पुर्णवाद नगर, दादोजी कोंडदेव नगर, अरिहंत नरसिंग होम परिसर, आकाशवाणी टॉवर परिसर, तिरुपती हाऊस परिसर, सहदेव नगर, सुयोजित गार्डन परिसर, आयचित नगर,गीतांजली सोसायटी, पंपीग स्टेशन, शांती निकेतन इत्यादी परिसरात
प्रभाग क्र.8 :- बळवंत नगर जलकुंभ वितरण क्षेत्रातील परिसर :- बळवंत नगर, रामेश्वर नगर, सिरीन मिडोज, सोमेश्वर कॉलनी, आनंद नगर, खांदवे नगर, सदगुरु नगर, पाटील लॉन्स परिसर, आनंदवल्ली, आनंदवल्ली गांव व परिसर, सावरकर नगर, शंकर नगर, शारदानगर, पाम स्प्रिंग, कल्याणी नगर, चित्रांगण सोसायटी, मते नर्सरी रोड, नरसिंह नगर, पंचम सोसायटी, राम नगर, दाते नगर, अयोध्या कॉलनी, भगुरकर मळा इ. परिसर.
गणेश नगर जलकुंभ वितरण क्षेत्रातील परिसर:– गणेश नगर, कामगार नगर, गुलमोहर कॉलनी, काळे नगर, सुयोग कॉलनी, पाईपलाईन रोड परिसर, गुरुजी हॉस्पिटल मागील परिसर विवेकानंद नगर, निर्मला विहार
प्रभाग क्र.9 (भागश:) :- ध्रुवनगर जलकुंभ वितरण क्षेत्रातील परिसर :- मोतीवाला कॉलेज परिसर, गुलमोहर कॉलनी परिसर, शिवशक्ती कॉलनी, तुकाराम क्रिडांगण परिसर व नवीन ध्रुवनगर परीसर इत्यादी
प्रभाग क्र. 12 (भागश:):- रामराज्य जलकुंभ वितरण क्षेत्रातील परिसर :- कल्पना नगर, मॉडेल कॉलनी, कृषी नगर परिसर, उदय कॉलनी, नेर्लीकर हॉस्पिटल, गंगापुर रोड स्वामी समर्थ मंदीर परिसर, डिसुझा कॉलनी, गंगापुर रोड परिसर.
तरी सदर परिसरातील नागरिकांनी याची नोंद घ्यावी व महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन मनपाच्या वतीने करण्यात आले आहे.