नाशिक शहरात शुक्रवारी “या” भागात पाणीपुरवठा बंद राहणार

 

नाशिक :- गांधीनगर जलशुध्दीकरण केंद्र व नाशिकरोड जलशुध्दीकरण केंद्र येथील गुरुत्व वाहिनीवरील 900 मि.मि. व्हॉल दुरुस्ती कामासाठी शुक्रवार दि. 11 फेब्रुवारी रोजी शटडाऊन आवश्यक आहे.

त्यामुळे मनपाचे गांधीनगर जलशुध्दीकरण केंद्र येथुन पाणी पुरवठा होणा-या नाशिक पुर्व विभागातील प्र.क्र. 23 भागश: व 30 भागश: साईनाथ नगर, विनय नगर, अमृत वर्षा कॉलनी, वडाळा रोड, जयदीप नगर, मिल्लत नगर, जे एम सी टी कॉलेज परिसर, रॉयल कॉलनी, रजा कॉलनी, रहनुमा नगर, गणेश बाबा नगर, आदित्य नगर, कल्पतरू नगर, पखाल रोड, मातोश्री कॉलनी, ममतानगर, अशोका मार्ग, इ. परीसर व संपुर्ण नाशिकरोड विभागातील प्रभाग क्र. 17,18,19,20, 21 व 22 मधील पाणीपुरवठा शुक्रवार दि. 11 फेब्रुवारी रोजीचा सकाळी 9 वाजेनंतर व सायंकाळचा पाणीपुरवठा होणार नाही तसेच शनिवार दि. 12 फेब्रुवारी रोजीचा सकाळचा पाणीपुरवठा कमी दाबाने होणार आहे.

नागरीकांनी नोंद घ्यावी व मनपास सहकार्य करावे, असे आवाहन मनपाच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!