नाशिकमध्ये उद्या “या” भागांत पाणी पुरवठा बंद राहणार

 

नाशिक :- पंचवटी विभागातील आर. पी. जलकुंभ, हनुमानवाडी जलकुंभ व मोरे मळा जलकुंभ भरणारी उर्ध्ववाहिनीस पंचवटी जलशुध्दीकरण केंद्रामधील आवारात क्रॉस कनेक्शन करावयाचे आहे.

हे काम उद्या (दि. 23) रोजी हाती घेण्यात येणार असल्याने आर. पी. जलकुंभ, हनुमानवाडी जलकुंभ व मोरे मळा जलकुंभ यावरुन प्र.क्र.4, 5 व 6 मधील जुने पंचवटी गावठाण परिसर, सेवाकूंज, गजानन चौक, गुरूद्वारा रोड, ढिकले नगर, सरदार चौक, नाग चौक, सिता गुंफा रोड, काळाराम मंदिर परिसर ते शनिचौक, सुकेनकर लेन, पंचवटी राजवाडा, आर.पी टाकी परिसर, वाल्मीकनगर, संजय नगर, वाघाडी लगतचा परिसर, गजानन कॉलनी, वाघ मळा, जगझाप मार्ग व मखमलाबाद रोडवरिल लगतचा परिसर, मधुबन कॉलनी, जाधव कॉलनी, नवनिर्माण चौक, उदय कॉलनी, कृष्णगनर, ड्रीमकॅसल परिसर, जाणता राजा कॉलनी काही परिसर, क्रांतीनगर, शिंदे मळा, वृंदावन नगर, प्रोफेसर कॉलनी, नागरे मळा, मोरे मळा, हनुमान वाडी, चौधरी मळा, तुळजा भवानी नगर इत्यादी परिसरात उद्या (दि. 23) पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

त्याचबरोबर मंगळवार दि. 24 जानेवारी रोजीचा सकाळचा पाणी पुरवठा कमी दाबाने होईल. याबाबत परिसरातील नागरिकांनी नोंद घेऊन महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!