नाशिक :- नाशिकरोड जलशुद्धीकरण केंद्र मधील जलकुंभावर पाईपलाईन जोडणीचे काम हाती घ्यावयाचे आहे. या कामाचे स्वरुप मोठे असल्याने कामास विलंब लागणार आहे.

त्यामुळे नाशिकरोड विभागातील प्रभाग क्रमांक २० मधील नवले चाळ, विभागीय आयुक्त कार्यालय व प्रभाग क्रमांक १९ ओढा रोड, इत्यादी परिसरात शुक्रवार दि. २२ जुलै रोजीचा पाणी पुरवठा होणार नाही व शनिवार दि. २३ जुलै रोजीचा सकाळचा पाणी पुरवठा कमी दाबाने होईल.
तरी याची नागरीकांनी नोंद घ्यावी व मनपास सहकार्य करावे, असे आवाहन मनपाच्या वतीने करण्यात आले आहे.