नाशिक (प्रतिनिधी) :- मनपाचे गंगापुर धरण रा. वॉटर पंपिंग स्टेशन येथे महावितरण कंपनीकडील अ) १३२ के. व्ही. सातपुर ब) १३२ के. व्ही. महिंद्रा या दोन एक्सप्रेस फिडरवरुन जॅकवेलसाठी ३३ के. व्ही. वीजपुरवठा कार्यान्वित आहे व मुकणे धरण रॉवॉटर पंपींग स्टेशन येथे महावितरण कंपनीचे रेमंड सबस्टेशन गोंदे येथुन ३३ के.व्ही वीजपुरवठा घेण्यात आलेला आहे.
या केंद्रांवरील महावितरणकडुन ओव्हरहेड लाईन व सबस्टेशनची पावसाळापुर्व कामे करण्यासाठी शनिवार दि. २१ मे रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपावेतो वीजपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.
त्यामुळे नाशिक पश्चिम व पंचवटी विभागामार्फत जलशुध्दीकरण केंद्रांकडे जाणारी अशुध्द पाण्याची मुख्य गुरुत्ववाहीनी गोदावरी नदीच्या उजव्या व डाव्या बाजुला दुरुस्त करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे नविन नाशिक सातपुर विभागामार्फत अशुध्द पाण्याची मुख्य गुरुत्ववाहीनी दुरुस्त करण्यात येणार आहे.
सबब या दोन्हीही ठिकाणाहून होणारा पुर्ण शहराचा पाणीपुरवठा शनिवार दि. २१ मे रोजी बंद ठेवून उपरोक्त नमुद कामे करता येणे शक्य होणार आहे. तरी मनपाचे मनपाचे गंगापुर धरण व मुकणे धरण रॉ. वॉटर पंपिंग स्टेशन येथून संपूर्ण शहरास होणारा शनिवार दि.२१ मे रोजीचा दुपारचा व सायंकाळचा पाणीपुरवठा होणार नाही तसेच रविवार दि. २२ मे रोजीचा सकाळचा पाणीपुरवठा कमी दाबाने होईल याची नागरीकांनी नोंद घ्यावी व मनपास सहकार्य करावे असे आवाहन मनपाच्या वतीने करण्यात आले आहे.