नाशिक (प्रतिनिधी) :- शिवसेनेचे नगरसेवक दीपक दातीर आणि नगरसेविका किरण दराडे यांचे पती बाळा दराडे यांना पोलिसांनी भाजपा कार्यालयावर दगडफेक केल्याप्रकरणी तडीपारीची नोटीस बजावली आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर ही कारवाई झाल्याने खळबळ उडाली आहे.

गेल्या काही महिन्यांपूर्वी एका वरिष्ठ नेत्याच्या वक्तव्यावरून भाजपा आणि सेनेत वाद झाले होते. त्यातून थेट भाजपा कार्यालयावर दगडफेक करण्याचा प्रकार घडला होता. यामध्ये वरील दोघांचा सहभाग होता. त्यावरून पोलिसांनी दातीर व दराडे या दोघांना तडीपरीची नोयीस बजावली असल्याचे समजते. या प्रकरणी आपणास तडीपार का करण्यात येऊ नये, असा प्रश्न पोलिसांनी उपस्थित केला आहे. या दोघांना 9 फेब्रुवारीपर्यंत नोटीसीला उत्तर द्यावे लागणार असून, ते काय उत्तर देतात याकडे लक्ष वेधले आहे.

दातीर व दराडे यांनी दिलेल्या उत्तरावर पोलिसांचे समाधान होते की त्यांना तडीपारीला सामोरे जावे लागते याकडेही लक्ष वेधले आहे.