नाशिक (प्रतिनिधी) :- सिटीलिंक शहर बस सेवेतील बसने धडक दिल्यामुळे निंबा उखा ह्याळीज (वय 85, रा. रायगड चौक, सिडको) या वृद्धास गंभीर दुखापत होऊन त्यांचे निधन झाले.

दिव्या अॅडलॅबसमोरील दोस्ती हॉटेलसमोर सिटी लिंक बस क्रमांक एमएच 15 जीव्ही 7967 या बसचे चालक अजय सुभाष कर्पे (वय 32, रा. लासलगाव) यांनी रस्ता ओलांडत असलेल्या निंबा ह्याळीज यांना धडक दिली.
या प्रकरणी त्यांचा नातू रूपेश दयाराम ह्याळीज (रा. रायगड चौक, सिडको) यांनी अंबड पोलिसांकडे तक्रार नोंदविली आहे. पुढील तपास अंबड पोलीस करीत आहेत.