कॉमनवेल्थ स्पर्धेच्या दहाव्या दिवशी भारत ‘इतक्या’ स्थानावर

बर्मिंगहॅम (भ्रमर वृत्तसेवा):- येथे सुरु असलेल्या कॉमनवेल्थ स्पर्धेच्या 22 व्या हंगामात ऑस्ट्रेलियाचा दबदबा पाहायला मिळत आहेत. या स्पर्धेच्या पहिल्या दिवसापासून दहाव्या दिवसांपर्यंत ऑस्ट्रेलियाचा संघ पदकतालिकेत अव्वल स्थानावर आहेत. ऑस्ट्रेलियानं आतापर्यंत 66 सुवर्णपदकासह एकूण 174 पदके जिंकली आहेत. तर, 55 सुवर्णपदक आणि एकूण 166 पदकांसह यजमान इंग्लंडचा संघ पदकतालिकेत दुसर्‍या स्थानावर आहे. कॉमनवेल्थ स्पर्धेच्या दहाव्या दिवशी भारतीय खेळाडूंनीही चांगलं प्रदर्शन करून दाखवत 15 पदके जिंकली.

चौथ्या क्रमांकावर न्यूझीलंड (19 सुवर्ण, एकूण 48 पदक), पाचव्या क्रमांकावर भारत (18 सुवर्ण, एकूण 55 पदक), सहाव्या क्रमांकावर स्कॉटलँड (12 सुवर्ण, एकूण 49 पदक), सातव्या क्रमांकावर नायजेरिया (12 सुवर्ण, एकूण 49 पदक), आठव्या क्रमांकावर वेल्स (8 सुवर्ण, एकूण 27 पदक), नवव्या क्रमांकावर दक्षिण आफ्रिका (7 सुवर्ण, एकूण 27 पदक) आणि दहाव्या क्रमांकावर उत्तर आयर्लंड (7 सुवर्ण, एकूण 18 पदक)
स्पर्धेचा आज अखेरचा दिवस

बर्मिंगहॅम स्पर्धेचा आज अकरावा आणि शेवटचा दिवस आहे. आज एकूण 12 सुवर्णपदके पणाला लागली आहेत. आजच्या दिवशी भारताला आपल्या खात्यात आणखी पाच सुवर्णपदक जमा करण्याची संधी आहे. टेबल टेनिस, बॅडमिंटन आणि हॉकीमध्ये भारतीय खेळाडू आज आपली ताकद दाखवतील.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!