औरंगाबाद : ऑनलाईन फसवणूक करणार्या मोठ्या रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. ऑनलाईन अॅपद्वारे आधी ग्राहकांना पैसे द्यायचे व त्यानंतर पैसे वसुलीच्या नावाखाली त्यांची फसवणूक करायची, असा प्रकार गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होता.
पैसे दिल्यानंतर पैसे वसुलीचा तगादा लावणे, कर्जदाराला शिवीगाळ करणे, धमक्या देणे, सोशल मीडियावर कर्जदारांचे फोटो मार्फ करून आरोपी सोशल मीडियावर व्हायरल करीत होते. यात सर्वाधिक फसवणूक ही उत्तराखंड राज्यातील नागरिकांची करण्यात आली होती. अखेर डेहराडून पोलिसांनी औरंगाबाच्या या कॉल सेंटरवर छापा टाकत एका मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे.

यावेळी एक हजारांपेक्षा अधिक मोबाईल जप्त केले आहेत, सोबत दोन तलवारीदेखील जप्त करण्यात आल्या आहेत. या कॉल सेंटरमध्ये दोनशेपेक्षा अधिक तरुण काम करीत असल्याचे समोर आले आहे. जेव्हा पोलिसांनी छापा टाकला तेव्हा हे तरुण कर्जदारांना शिवीगाळ करताना आढळून आले आहेत.