राज्यात फक्त एक टक्काच पेरणी

मुंबई (भ्रमर वृत्तसेवा):- राज्यात मान्सून दाखल झाला मात्र, अद्याप पाऊसच नसल्याचं चित्र दिसत आहे. शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत आहेत. खरीपाच्या पेरणीसाठी राज्यातील शेतकरी सज्ज झाले आहेत. राज्यात आत्तापर्यंत केवळ 1 टक्काच पेरणी झाली आहे. 18 जिल्ह्यात कमी पाऊस झाला आहे. त्यामुळं राज्यातील शेतकर्‍यांची चिंता वाढली आहे.

एकीकडे हवामान खात्याकडून भाकितांचा पाऊस पडतोय, तर दुसरीकडे राज्यभरात पावसाअभावी पेरणी रखडली आहे.मान्सूसनने महाराष्ट्र व्यापल्याचं हवामान खात्यानं जाहीर केलें असले तरी प्रत्यक्षात राज्यभरात पावसाची प्रतीक्षा आहे. जूनचा तिसरा आठवडा संपायला आलाय, तरी राज्यभरात केवळ 1 टक्का इतकीच पेरणी झाली आहे.

राज्यातील खरीपाच्या दीड कोटी हेक्टर क्षेत्रापैकी 17 जूनपर्यंत केवळ एक लाख 47 हजार हेक्टरवर पेरणी झाली आहे. गतवर्षी 17 जूनपर्यंत पावणेपाच लाख हेक्टरवर पिकांची पेरणी झाली होती. पण, आता पावसानं दडी मारल्याने शेतकर्‍यांना पेरणीची तिफण गोठ्यातच ठेवावी लागली आहे.

error: Content is protected !!