नवी दिल्ली (भ्रमर वृत्तसेवा):- कॉमनवेल्थ गेम्स 2022 स्पर्धेला आजपासून सुरुवात होणार आहे. 28 जुलै पासून ते 8 ऑगस्टपर्यंत चालणार्या या स्पर्धेत विविध खेळांत जगभरातील टॉपचे खेळाडू सहभागी होतील. पण खेळांना सुरुवात होण्यापूर्वी आज स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे.
आज कॉमनवेल्थ खेळांचा धमाकेदार ओपनिंग सेरेमनी होणार आहे. या खेळांना आता सुरुवात होणार असून यंदा 72 देशांतील 5 हजार 54 खेळाडू यात सहभागी होतील. 11 दिवस चालणार्या या स्पर्धेत 20 विविध खेळांच्या 280 स्पर्धा खेळवल्या जातील. सर्धेचा ओपनिंग सेरेमनी बर्मिंगहमच्यअलेक्झांडर स्टेडियममध्ये (-पार पडणार आहे. हा सोहळा स्थानिक भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 11 वाजून 30 मिनिटांनी पार पडेल.
या स्पर्धेत यंदा महिलांच्या टी-20 चे क्रिकेट सामनेही ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे यंदा भारत किती पदके जिंकतो याकडे लक्ष लागून राहिले आहे.