मुंबई :- येथे काल झालेल्या एका कार्यक्रमात केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून भगसिंह कोश्यारी यांच्या विरुद्ध विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहे. खा. संजय राऊत, आ. अमोल मिटकरी, काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी त्यांच्यावर निशाणा साधला. राज्यपालांनी केलेल्या या वक्तव्यामुळे महाराष्ट्राचा अपमान केला आहे असा आरोप विरोधक करीत आहेत.

काल मुंबईतील अंधेरी पश्चिम भागात स्थानिक चौकाला दिवंगत श्रीमती शांतीदेवी चंपालालजी कोठारी यांचे नाव देण्यात आले. त्यावेळी बोलताना कोश्यारी म्हणाले, की गुजराती आणि राजस्थानी निघून गेले तर मुंबईत पैसाच उरणार नाही आणि मुंबई आर्थिक राजधानी राहणार नाही.

राज्यपालांच्या हे वक्तव्यमुळे सामान्य नागरिकही दुखावला असल्याचे विरोधक सांगता आहेत. ते म्हणाले हा महाराष्ट्राचा अपमान आहे. राज्यपालांना नारळ द्या अशी मागणी आता विरोधकांनी केली आहे.
https://ashishprovision.com/shop?category=shravan-somwar-special
खा. संजय राऊत यांनी यासंदर्भात ट्वीट करत म्हटले आहे की, महाराष्ट्रात भाजपा पुरस्कृत मुख्यमंत्री होताच मराठी माणूस आणि शिवरायांचा अपमान सुरू झाला. स्वाभिमान अभिमान यावर बाहेर पडलेला गट हे ऐकूनही गप्प बसणार असेल तर शिवसेनेचे नाव घेऊ नका. मुख्यमंत्री शिंदे राज्यपालांचा साधा निषेध तरी करा. मराठी कष्टकरी जनतेचा हा अपमान आहे.
थोडक्यात काय तर महाराष्ट्र व मराठी माणूस भिकारडा
आहे… 105 मराठी हुतात्म्यांचा असा अपमान मोरारजी देसाई यांनी देखील केला नव्हता.. मुख्यमंत्री शिंदे …ऐकताय ना.
की तुमचा महाराष्ट्र वेगळा आहे..
स्वाभिमानाचा अंश उरला असेल तर आधी राज्यपालांचा राजीनामा मागा..
दिल्ली पुढे किती झुकताय? असे राऊतांनी म्हटले आहे.
https://twitter.com/rautsanjay61/status/1553206779403649025?t=OAnhEc3zJF0u4CIJOWEldA&s=19
काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी ट्वीट करत म्हटले आहे की, राज्याचा राज्यपाल त्याच राज्याच्या जनतेची बदनामी करतो हे भयंकर आहे. गुजराती राजस्थानी हा विषय राहू द्या यांनाच सर्वात आधी नारळ दिला पाहिजे. यांच्या कारकिर्दीत राज्यपाल या संस्थेचा व महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेचा स्तर तर खालावला आहेच, पण महाराष्ट्राचा अवमानही सातत्याने झाला आहे.