गौतमी पाटीलवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश; नेमके प्रकरण काय?

मुंबई : लावणी क्वीन म्हणून सध्या प्रसिद्ध असणारी गौतमी पाटील वेगवेगळ्या कारणांसाठी गाजते आहे. गौतमी पाटील हे नाव आता महाराष्ट्राला नवे राहिलेले नाही. पण आता गौतमी पाटीलच्या अडचणीत वाढ झाली आहे. सातारा न्यायालयाने गौतमीवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

गौतमी पाटील अश्लील डान्स करत असल्याचा आरोप अनेकांनी केला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी प्रतिमा शेलार यांनी गौतमी तिच्या नृत्यात अश्लील कृत्य करत असल्याचा आरोप करत तक्रार दाखल केली होती. आता त्यांच्या तक्रारीची दखल घेत सातारा न्यायालयाने गौतमी पाटीलवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

गौतमीने आपल्या सौंदर्याने आणि अदांनी महाराष्ट्रातील गावागावांतील सर्वच तरुणांना भूरळ घातली आहे. पण दुसरीकडे गौतमीच्या नृत्याने काही महिलांच्या भावना दुखावल्या आहेत. लावणी ही लोककला आहे. लोककलेत अश्लिलता येत नाही. लावणीकडे बघण्याचा समाजातील महिलांचा दृष्टीकोन बदलत असताना गौतमीने लावणीची संस्कृती जपावी, लावणी सादर करताना त्यात अश्लीलपणा करू नये असे म्हणत तिच्यावर अनेकदा टीका करण्यात आली आहे.

गौतमीच्या डान्सचे व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते. त्यानंतर तिच्यावर टीका करण्यात आली. समाजातील वेगवेगळ्या स्तरातील मंडळींसह लावणी क्षेत्रातील अनेक दिग्गजांनी देखील गौतमीवर टीका केली होती. त्यानंतर गौतमीने जाहीर माफी मागितली होती.

https://www.instagram.com/p/Cnhh4XrtJ7Q/?utm_source=ig_web_copy_link

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!