पाक कर्णधाराने ठोकले सलग तिसरे शतक, विराटचा विक्रम संकटात!

 त्रिनिदाद(वृत्तसेवा):– वेस्ट इंडिज विरुद्ध झालेल्या सामन्यात सलग तिसरे एकदिवसीय शतक ठोकून पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने विराट कोहलीच्या नावे असलेला एक विक्रम आपल्या नावे केला.

सध्या क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांमधील पाकिस्तानी संघाची धुरा बाबर आझमच्या हाती देण्यात आलेली आहे. बाबर आझमदेखील कर्णधारपदाच्या लौकिकाला साजेसा खेळ करताना दिसत आहे. बाबर सध्या अतिशय चांगल्या फॉर्ममध्ये आहे. त्याने आपल्या शानदार फलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. काल झालेल्या (8 जून) वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात पाकिस्तानी कर्णधाराने शतक झळकावून पाकिस्तानच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.

बाबरने 107 चेंडूत 9 चौकारांच्या मदतीने 103 धावांची खेळी केली. त्याचे हे सलग तिसरे एकदिवसीय आंतरराष्ट्रीय शतक आहे. तो एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये दोनदा सलग तीन शतके झळकावणारा जगातील पहिला फलंदाज ठरला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!