नाशिकरोड (प्रतिनिधी):- मुबंई वरून भुसावळ कडे जाणाऱ्या पवन एक्स्प्रेस ला लहवीत स्थानका दरम्यान गाडी रुळा वरून घसरून मोठा अपघात झाला असून त्यात काही प्रवासी मयत झाला असल्याची माहिती समजली आहे.

या बाबत अधिक माहिती अशी की, मुबंई लोकमान्य टिळक टर्मिनस या ठिकाणा वरून आज सकाळी 11:30वाजेला भुसावळ कडे जाणारी पवन दरभंगा एक्स्प्रेस इगतपुरी स्थानक सोडल्या नंतर नाशिक कडे येत असताना लहवीत स्थानका दरम्यान रुळा वरून घसरली. गाडी चा वेग तशी नव्वद किलोमीटर असल्याने वातानुकूलित व स्लीपर कोच चे किती दहा बोगी घसरून रुळा पासून वेगळे झाले. या मुळे मोठ्या प्रमाणात रूळ उधडले गेले. यात अनेक प्रसावी जखमी झाले असून दोन प्रवासी मयत झाल्याचे वृत्त आहे.अनेक प्रसावी यांना उपचारासाठी बिटको हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात येत आहे.
या अपघातामुळे मुबंई वरून येणारी पंचवटी एक्स्प्रेस, नंदीग्राम एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्याची माहिती आहे, या नंतर अनेक गाड्या रद्द होऊ शकता किंवा पुणे मार्ग रवाना होऊ शकता. रेल्वे चे अनेक अधिकारी घटनास्थळी रवाना होत आहे.