नाशिक : महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ५४ व्या वाढदिवसानिमित्त नाशिक मनसे शहराध्यक्ष दिलीप दातीर यांच्या तर्फे शहरवासियांना पेट्रोलवर ५४ रुपयांची भरीव सूट देण्यात आली.

नवीन नाशिक विभागातील शिवांजली पेट्रोलियम, साई पेट्रोलियम, श्री सिद्धी पेट्रोलियम या पंपांवर तब्बल १५०० दुचाकी वाहनांना पेट्रोलवर ५४ रुपयांची भरीव सूट देण्यात आली.

पेट्रोल डिझेलच्या चढ्या दराने व महागाईने होरपळलेल्या नाशिककरांनी या अभिनव संकल्पनेचे कौतुक केले व समाधान व्यक्त केले.
या प्रसंगी जिल्हाध्यक्ष अंकुश पवार, शहराध्यक्ष दिलीप दातीर, शहर समन्वयक सचिन भोसले, नवीन नाशिक विभाग अध्यक्ष नितीन माळी, मनविसे प्रदेश उपाध्यक्ष गणेश मोरे, जिल्हाध्यक्ष कौशल (बब्बू) पाटील, शाम गोहाड, शहराध्यक्ष संदेश जगताप, ललित वाघ, जिल्हा चिटणीस अक्षय कोंबडे, महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना जिल्हा चिटणीस तुषार जगताप, शारिरीक सेना शहराध्यक्ष विजय आगळे, ज्योतीताई शिंदे, शाखा अध्यक्ष पंकज दातीर, राहुल पाटील, मेघराज नवले, मनोज सावंत, भुषण सुर्यवंशी, विकी जाधव, मनोज गोवर्धने आदी पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.